Asia cup: आशिया कप फायनलची तिकिटं कितीला? जाणून घ्या किंमत आणि सविस्तर माहिती

Asia Cup: आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान तिसऱ्यांदा समोरासमोर भिडणार आहेत. यावेळी ही टक्कर ट्रॉफीसाठी असेल आणि जो जिंकेल तोच चॅम्पियन ठरेल. आशिया कपच्या 41 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान यांचा अंतिम सामना रंगणार आहे. या रोमांचक लढतीला सुरुवात होण्यासाठी आता 24 तासांपेक्षाही कमी वेळ उरला आहे. सामना मैदानात बसून लाईव्ह पाहण्याचा आनंदच काही वेगळा असतो. पण प्रश्न असा आहे की भारत-पाक अंतिम सामन्याचे (IND vs PAK Final Ticket Price) तिकीट अजूनही उपलब्ध आहे का? जाणून घेऊया याबाबतची सविस्तर माहिती.

साधारणपणे भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्यांची तिकीटे काही मिनिटांतच संपून जातात. पण आशिया कपमध्ये असे झालेले नाही. भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप अंतिम सामन्याची काही तिकीटे अजूनही उपलब्ध आहेत. प्लॅटिनमलिस्ट.नेट या वेबसाइटद्वारे तुम्ही ही तिकीटे खरेदी करू शकता. या संकेतस्थळानुसार जनरल वेस्ट, जनरल ईस्ट, पॅव्हेलियन वेस्ट, व्हीआयपी सूट वेस्ट 11 स्टँड आणि प्लॅटिनम ही तिकीटे आधीच विकली गेली आहेत.

भारत विरुद्ध पाकिस्तान अंतिम सामन्यासाठी स्काय बॉक्सची तिकीटे उपलब्ध असून त्यांची किंमत सुमारे 2 लाख रुपयांपासून सुरू होत आहे. त्याचप्रमाणे व्हीआयपी सूट वेस्ट 12 स्टँडमध्ये एका तिकिटाची किंमत 2.7 लाख रुपये आहे. याशिवाय द ग्रँड लाउंजची तिकीटेही अजून उपलब्ध असून, एक तिकीट खरेदी करण्यासाठी तुम्हाला 88 हजार रुपये मोजावे लागतील. तर बाउंड्री लाउंजमधील एक तिकीट घेण्यासाठी साडेएक लाख रुपये खर्च करावे लागतील.

भारत आणि पाकिस्तान यांचा अंतिम सामना (28 सप्टेंबर) रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल. दोन्ही संघ पहिल्यांदाच आशिया कपच्या अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत.

Comments are closed.