सहकार्य

मन मुळात जन्मत सज्जन असतं, निर्मळ असतं, निर्विकार असतं. जसजसे आपण वाढीस लागतो तेव्हा सभोवतालच्या वातावरणातून, कळत-नकळत होणाऱया संस्कारातून, आघातातून मन विकारी बनत जातं, मलिन होतं. रामदास स्वामी मनाला हे सज्जन मना म्हणून संबोधतात. हे सज्जन मना, तू भक्ती पंथाचा मार्ग धर भक्तिपंथ म्हणजे काय? प्रेमाचा, श्रद्धेचा, सहयोगाचा, उपासनेचा, शुद्धतेचा, सहभागाचा मार्ग.
भक्ती कुणाची करायची? तर `जे जे भेटते भूत, ते ते जाणिजे भगवंत.’ या उक्तीनुसार सभोवताली जे चराचर आहे त्यातील सर्व प्राणिमात्रांमध्ये भगवंताचा वास आहे, त्या प्रत्येक घटकावर आपण प्रेम करणं म्हणजेच भक्ती करणे होय. ती भक्तीदेखील सहज भक्ती असावी. सर्वांभूती परमेश्वर पाहून त्याप्रमाणेच आचरण करणे म्हणजे भक्तीचा मार्ग धरणे. मन शुद्धीकरणाचा हा एक मार्ग. मन शुद्ध करण्याचात्या पुढचा मार्ग कोणता? तर जनी निंद्य ते सर्व सोडून द्यावे. ज्या ज्या निंदनीय, वाईट ठरवलेल्या गोष्टी आहेत त्या सोडून देणे. जनी वंद्य ते सर्व भावे करावे. म्हणजे वंदनीय गोष्टी, ज्या लोकमान्य गोष्टी आहेत त्या आचरणात आणाव्या किंवा त्याचे आचरण करावे. संध्या शहापुरे
Comments are closed.