हिंदी साहित्यकार कुमार अंबुज यांना कुसुमाग्रज पुरस्कार

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाद्वारे दिला जाणारा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार या वर्षी हिंदी कवी कुमार अंबुज यांना देण्यात आला. नुकताच हा पुरस्कार प्रदान सोहळा नाशिक येथे पार पडला. 2010 पासून दरवर्षी कुसुमाग्रज अध्यासनामार्फत निवडक अमराठी कवीला हा पुरस्कार दिला जातो. कवी कुमार अंबुज हे हिंदी साहित्यातील एक दमदार कवी, कथालेखक, समीक्षक आहेत. कवी अंबुज यांच्या साहित्यसंपदेला अनेक पुरस्कार लाभले असून त्यांच्या कवितांचा विशेष चाहतावर्ग आहे. त्यांचा ‘किवाड’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. ज्याला खूप प्रसिद्धी लाभली. हिंदी साहित्यात कवी अंबुज यांचे विचार, त्यातील आशय विशिष्ट सामाजिक भूमिका मांडणारा आहे. ‘तुम्हारी जाति क्या है?’ ही त्यांची गाजेली कविता. त्यांच्या कवितांतून ग्रामीण जीवन, तिथल्या रिती, परंपरा यांचे दर्शन होते. गावगाडय़ातील जातीपाती, त्यांतील भेद, त्यातून उभे राहिलेले समाजजीवन अनुभवताना आपण समाजाच्या कोणत्या चौकटीत उभे आहोत याची जाणीव होते. कुमार अंबुज यांच्या कविता लोकांच्या जीवनाचे चित्रमय रूप दर्शवताना एक भावभावनांचे वेगळे जग उभे करतात. किवाड या काव्यसंग्रहासोबतच क्रूरता, अनंतिम, आमिरी रेखा, अतिक्रमण हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध असून किवाड या काव्यसंग्रहाला भारत भूषण अग्रवाल पुरस्कार लाभला आहे.

Comments are closed.