मुंब्यात लाचखोर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एटीएसच्या जाळ्यात, 25 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करतो, असे सांगून २५ हजारांची लाच स्वीकारताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. शशिकांत भालेराव असे लाचखोर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मदत करतो असे सांगून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भालेराव यांनी त्याच्याकडे ५० हजारांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ही रक्कम २५ हजार ठरली. याबाबत तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीत तथ्य असल्याचे आढळल्यानंतर एटीएसने मुंब्रा पोलीस ठाण्यात सापळा रचला.
Comments are closed.