दातांसाठी सर्वात घातक काय बिस्कीट की चॉकलेट? शाहरुख खानच्या डेंटिस्टने केला खुलासा

बिस्किटे आणि चॉकलेट हे दोन पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. पालक बहुतेकवेळा मुलांना चॉकलेट खाणं थांबवतात, पण बिस्किटे खायला परवानगी देतात. मात्र, दातांच्या आरोग्याच्या दृष्टीने पाहता, खरं तर बिस्किटे अधिक धोकादायक ठरतात. (biscuits vs chocolate which is harmful for teeth)

ग्लुकोज बिस्किटांमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं आणि ती खाल्ल्यानंतर तोंडात जास्त काळ राहतात. त्यामुळे ती दातांमध्ये अडकतात आणि जंतूंच्या वाढीस पोषक वातावरण तयार होतं. हे जंतू आम्ल तयार करून हळूहळू दातांवर परिणाम करतात आणि शेवटी दातात छिद्र म्हणजेच पोकळी निर्माण होते.

चॉकलेटच्या तुलनेत बिस्किटे तोंडात जास्त चिकटतात आणि जास्त वेळ राहतात. त्यामुळे दातांवर आम्लाचा प्रभाव जास्त प्रमाणात होतो. दुसरीकडे, चॉकलेट तोंडात पटकन विरघळतात. विशेषत: डार्क चॉकलेटमध्ये काही नैसर्गिक घटक असतात जे जंतूंची वाढ रोखण्यास मदत करतात. त्यामुळे बिस्किटांच्या तुलनेत चॉकलेट थोडं सुरक्षित ठरतं.

मग उपाय काय?

– चॉकलेट किंवा बिस्किटे दोन्हीही प्रमाणात खा.

– खाल्ल्यानंतर पाणी प्या किंवा तोंड धुवा.

– दररोज दोन वेळा ब्रश करा.

– डार्क चॉकलेट निवडा, कारण त्यात साखर कमी असते.

– अधूनमधून दंतवैद्याकडे तपासणीसाठी जा.

डॉक्टर देविकर म्हणाले की, बिस्किटे आणि चॉकलेट यांपैकी बिस्किटे दातांसाठी अधिक घातक ठरतात. कारण ती जास्त वेळ तोंडात राहतात आणि दातांना चिकटतात. मात्र, कोणताही पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास तो हानिकारक ठरतो. त्यामुळे संतुलित प्रमाणात खाणं, तोंडाची योग्य काळजी घेणं आणि स्वच्छता राखणं हेच दातांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे.

Comments are closed.