ब्रेकिंग न्यूज! बीसीसीआयची कमान आता जम्मूच्या सुपुत्राकडे, मिथुन मन्हास नवे अध्यक्ष!
दिल्ली रणजी संघाचे माजी कर्णधार मिथुन मन्हास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) नवे अध्यक्ष झाले आहेत. 45 वर्षीय मन्हास रॉजर बिन्नी यांची जागा घेणार आहेत.
मिथुन मन्हास सध्या जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे (जेकेसीए) प्रशासक आहेत. यापूर्वी ते दुलीप ट्रॉफीसाठी उत्तर विभागाचे संयोजक राहिले होते तसेच आयपीएलमधील गुजरात टायटन्स संघासाठी सपोर्ट स्टाफ सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
अध्यक्षपदासाठी मन्हास यांची निवड अनेकांसाठी आश्चर्याची ठरली. या शर्यतीत हरभजन सिंग आणि रघुराम भट्ट यांसारखे माजी भारतीय खेळाडूही होते. मात्र, अखेरीस मन्हास यांची निवड झाली. भट्ट यांना खजिनदार पदाची संधी मिळू शकते, अशी माहिती आहे.
मन्हास यांचा क्रिकेट प्रवासही मोठा आहे. त्यांनी 18 वर्षांच्या कारकिर्दीत 157 प्रथम श्रेणी सामने खेळले असून 9714 धावा केल्या आहेत. त्यांची ही मोठी कामगिरी आणि प्रशासकीय अनुभव यामुळेच त्यांना हे सर्वोच्च पद मिळाले आहे.
माजी अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी 70 वर्षांच्या वयोमर्यादेमुळे पदाचा राजीनामा दिला होता. आता त्यांच्या जागी मिथुन मन्हास बीसीसीआयच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळणार आहेत.
उत्सव साजरा करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण प्रसंग!
मिथुन मॅन्हास यांना अधिकृतपणे 'भारतातील क्रिकेटच्या नियंत्रण मंडळाचे नवीन अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. #बीसीसीआय?
पूर्वीच्या डोडाच्या जिल्ह्यासाठी किती प्रासंगिक रविवार आहे, जम्मू आणि काश्मीरच्या दुर्गम भागांपैकी एक, जो संयोगाने… pic.twitter.com/i6ppemth2t– डॉ. जितेंद्र सिंह (@drjitendrasing) 28 सप्टेंबर, 2025
बातमी अपडेट होत आहे..
Comments are closed.