हे तर संघाचे षडयंत्र, विजयादशमीच्या कार्यक्रमात सहभागी होण्याच्या वृत्तावर सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री कमलताई यांचे स्पष्टीकरण

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीच्या कार्यक्रमात आपण सहभागी होणार नाही, असे स्पष्टीकरण सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई यांनी दिले आहे. हे संघाचे षडयंत्र असून आपल्याबद्दल जी फेक न्यूज पसरली आहे त्याचा निषेधही कमलताई यांनी केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की अमरावतीत विजयादशमीनिमित्त श्रीमती नरसम्मा महाविद्यालयाच्या पटांगणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम होणार होता. या कार्यक्रमाला कमलाताई गवई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होत्या अशी एक बातमी समोर आली होती. पण ही फेक न्यूज आहे असे कमलताई यांनी स्पष्ट केले.

कमलताई यांनी एक पत्र जारी करून म्हटले आहे की, मी आंबेडकरी, संविधानाप्रती प्रामाणिक राहिल. अमरावती महाराष्ट्र राज्यातून नुकत्याच श्री दादासाहेब गवई प्रकाशित झालेल्या आरएस. एस. विजयादशमी कार्यक्रम दि. ०५ ऑक्टोबर सायं. ६:३० वाजता आयोजीत श्रीमती नरसम्मा महाविद्यालय मैदानात होणाऱ्या कार्यक्रमाची बातमी धादांत खोटी आहे. गवई, चॅरिटेबल ट्रस्टची संस्थापक अध्यक्षा म्हणून आंबेडकरी देशाच्या संविधानाप्रती माझे घराणे अविरत प्रामाणिक असल्यामुळे आर.एस.एस. च्या अमरावती येथील आगामी होवू घातलेल्या कार्यक्रमाला कदापिही हजर होणार नाही. सामाजिक जाणिवेला कुठल्याही प्रकारे प्रकारे दुःख होऊ देणार नाही. महाराष्ट्रातीलच नव्हे तर सर्व भारतातील जनेतेने याची नोंद घ्यावी. विजयाद‌शमी ही हिन्दु संस्कृती असली तरी आम्हांकरिता धम्मचक्र प्रवर्तन दिन अशोका विजया‌जदशमी महत्वपूर्ण आहे. अपप्रचार किंवा बातमीला सामाजिकट्ट दृष्ट्या बळी न पडता या निवेदनाद्वारे झालेल्या बातमीचा निषेध व धिक्कार करते. माझ्या तमाम आंबेडकरी जनतेनी याची घेऊन माझ्यावर विश्वास ठेवावा. मला विश्वासात न घेता, किंवा लेखी होकार न घेता हे आरएसएसचे षड्यंत्र आहे. सदरहू निमंत्रण मी स्विकृत करीत नाही. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक
साहेब गवई परिवारातर्फ शुभेच्छा व साधुवात.

Comments are closed.