पीसीबीची अर्शदीप विरुद्ध तक्रार, आयसीसी करणार का मोठी कारवाई?
आशिया कप 2025 च्या फाइनल सामन्यात टीम इंडिया आणि पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत. फाइनल सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळला जाईल आणि दोन्ही टीम्स त्यासाठी तयार आहेत. फाइनलपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगविरुद्ध आयसीसीकडे तक्रार केली आहे. आता हे पहायचे की आयसीसी अर्शदीपबाबत काय निर्णय घेते.
मागच्या वेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुपर-4 मध्ये सामना खेळला गेला होता. या सामन्यात खूप गोंधळ पाहायला मिळाला. सुरुवातीला पाकिस्तानचे हारिस रऊफ आणि शाहीन अफ्रिदी हे टीम इंडियाच्या शुभमन गिल आणि अभिषेक शर्माशी भिडताना दिसले. त्यानंतर हारिस रऊफने प्रेक्षकांकडे भडकावणारा इशारा केला होता, ज्यावर बीसीसीआयने आक्षेप घेतला आणि हारिसविरुद्ध आयसीसीकडे तक्रार केली. त्यासाठी त्याच्यावर सामन्याच्या फीच्या 30 टक्के दंडही ठोठावण्यात आला. या सामन्यात अर्शदीप सिंगचा देखील एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. त्यावर पीसीबीने आक्षेप घेत अर्शदीप सिंगविरुद्ध आयसीसीकडे तक्रार नोंदवली.
आयसीसीकडे तक्रार करताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) लिहिले की अर्शदीप सिंगने आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. त्यांनी सामन्यादरम्यान अश्लील इशारे केले, ज्यामुळे खेळभावनेला धक्का बसतो. याबाबत आयसीसीने अर्शदीपवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
याआधी पीसीबीने टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्याबाबतही आयसीसीकडे तक्रार केली होती. त्यानंतर आयसीसीने सूर्यावर कारवाई करत सामना फीच्या 30 टक्के दंडाची शिक्षा ठोठावली होती. मात्र बीसीसीआयने आयसीसीच्या या निर्णयाला आव्हान दिले होते. पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला होता की, “हा विजय आम्ही पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना समर्पित करतो.” सूर्या यांची ही देशभक्ती पाकिस्तानला मान्य झाली नव्हती.
Comments are closed.