नात्यात तुम्हाला ‘गॅसलाईट’ तर केलं जात नाही? जाणून घ्या महत्वाचे संकेत
आजच्या काळात रिलेशनशिपचे अनेक ट्रेंड सोशल मीडियावर चर्चेत असतात. कधी मायक्रो चीटिंग, तर कधी श्रेकिंग असे शब्द व्हायरल होत असतात. अलीकडे अशाच एका ट्रेंडची चर्चा वाढली आहे तो म्हणजे गॅसलायटिंग (Gaslighting). हा फक्त शब्द नाही, तर मानसिक शोषणाचा धोकादायक प्रकार आहे. यात एखाद्या व्यक्तीला तिच्या विचारांवर, आठवणींवर किंवा निर्णयक्षमतेवरच शंका घेण्यास भाग पाडलं जातं. (signs of gaslighting in relationships)
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, असे वागणारे बहुतेकदा आपलेच जवळचे लोक असतात पार्टनर, कुटुंबातील सदस्य किंवा ओळखीचे. त्यामुळे हे ओळखणं आणि स्वतःला सुरक्षित ठेवणं महत्त्वाचं ठरतं.
गॅसलायटिंगची प्रमुख लक्षणं
1) सतत स्वतःच्या विचारांबद्दल संशय निर्माण होणे
2) “मी चुकीचा/चुकीचीच आहे” असा नकारात्मक विचार मनात वाढणे
3) स्मरणशक्तीवर शंका येणे “मला नीट आठवत नाही” असं वाटणं
4) वारंवार स्वतःला दोषी ठरवणं किंवा माफी मागणं
5) इतरांशी मिसळण्याची इच्छा कमी होणे, एकटे राहणं
6) Gaslight करणारी व्यक्ती तुमच्यावर जबाबदारी ढकलते, पण स्वतः कधीच चुकीची मान्य करत नाही
कोणत्या नात्यांमध्ये जास्त आढळते?
प्रेमसंबंधात: पार्टनरवर नियंत्रण ठेवण्यासाठी, त्याचा आत्मविश्वास तोडण्यासाठी हे जास्त दिसून येतं.
मुलं आणि पालकांमध्ये: मुलांना वारंवार दोष देणं, त्यांना अपराधी वाटायला लावणं.
कार्यक्षेत्रात: वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ कर्मचाऱ्यांना असुरक्षिततेत ढकलतात, त्यांची किंमत कमी दाखवतात.
कसं ओळखाल की तुमच्यासोबत गॅसलायटिंग होत आहे?
1) तो/ती कधीच स्वतःची चूक मान्य करत नाही.
2) “तुला काहीच लक्षात राहत नाही” असा सतत आरोप करतो/करते.
3) तुमच्या कमकुवत बाजूंचा गैरफायदा घेतो/घेते.
4) भूतकाळातील चुका उकरून काढून तुम्हालाच दोष देतो/देते.
5) “सॉरी” शब्द कधीही ऐकायला मिळत नाही.
उपाय काय?
1) स्वतःवर विश्वास ठेवा.
2) वारंवार माफी मागणं थांबवा.
3) नात्यात स्पष्टपणे मर्यादा आखा.
4) गरज वाटल्यास विश्वासू व्यक्तीशी बोला.
5) तुमच्या मानसिक शांततेसाठी अशा नात्यांपासून दूर राहणं हाच सर्वोत्तम पर्याय आहे.
गॅसलायटिंग ही एक गंभीर मानसिक छळाची पद्धत आहे. नातं कोणतंही असो पार्टनरशी, कुटुंबाशी किंवा कामाच्या ठिकाणी हे वर्तन ओळखणं आणि त्यापासून स्वतःला वाचवणं गरजेचं आहे. आत्मविश्वास ठेवा, कारण मानसिक शांतता हीच खरी नात्यांची पायरी आहे.
Comments are closed.