Beed News गेवराई तालुक्यातील 32 गावांना पूराचा धोका, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरुवात

जायकवाडी प्रकल्पामध्ये आवक वाढल्याने गोदावरीच्या नदीपात्रातून अडीच लाख क्युसेस पाणी सोडले जात आहे. बीड जिल्ह्यातील गोदाकाठावर वसलेल्या 62 गावांसाठी आजची रात्र वैर्‍याची असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर गेवराई तालुक्यातील 32 गावांमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे.

गेवराईतील या गावांना पूराचा धोका –
राजापूर, आगरनांदुर, संगमजळगाव, हिंगणगाव, गोंदी खु., कटचिंचोली, पांगुळगाव, सुरळेगाव, पांचाळेश्वर, राक्षसभुवन, म्हाळसपिंपळगाव, सावळेश्वर, खामगाव, गंगावाडी, काठोडा, नागझरी, राहेरी, बोरगावथडी, भोगलगाव, पांढरी, मिरगांव, तपेनिमगांव, ढालेगाव, श्रीपत अंतरवाला, गोपत पिंपळगाव, रामपुरी, मनुबाई जवळा, गुळज (भगवाननगर), पाथरवाला बु., गुंतेगाव, पाथरवाला खु., बोरगाव बु. या गावांचा समावेश आहे.

माजलगाव तालुक्यातील या 32 गावांना सतर्कतेचा इशारा

माजलगाव- पैठणच्या जायकवाडी धरणातून अडीच लाख क्युसेस ने गोदावरी नदीमध्ये पाणी सोडल्याने त्याचा माजलगाव तालुक्यातील 32 गावांना पुराचा धोका निर्माण झाला असून यातील अनेक गावांमध्ये आज मध्यरात्री रात्री केव्हाही पुराचे पाणी येऊ शकते त्यामुळे प्रशासनाने या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

खतगव्हाण, पिंपरी खुर्द, मोगरा, शु.लिमगाव, सोन्थडी, गुंजथडी, सुरुमगाव, गंगामसला, आडोळा स. पिंपळगाव, आबेगाव, मंजरथ, आळसेवाडी, छत्रबोरगाव, सादोळा, पुरुषोत्तमपुरी, महातपुरी काळेगावथडी, हिवरा.बु, कवडगावथडी, डुब्बाथडी, गव्हाणथडी, शेलगावथडी, रिधोरी, मनुर, लुखेगाव, गोविंदपुर, सांडस चिंचोली, देपेगांव,रोषणपुरी, नागडगाव या ३२ गावांना पुराचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

Comments are closed.