भारताचं विमान पाडल्याची अ‍ॅक्टिंग करणाऱ्या रौफला बुमराहने इंगा दाखवला! मैदानात असं काही केलं की


भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया चषक अंतिम 2025: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप फायनल दुबईमध्ये सुरू आहे. भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पाकिस्तानी खेळाडू हरिस रौफला चोख प्रत्युत्तर दिले आहे. बुमराहने रौफला क्लीन बोल्ड केले आणि पाकिस्तानी खेळाडूला त्याच्याच भाषेत सेलिब्रेशनने उत्तर दिले.

जसप्रीत बुमराहचं हरिस रौफला चोख प्रत्युत्तर

भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने हरिस रौफला बोल्ड करत पाकिस्तानचा नववा गडी टिपला. हरिस रौफला बाद केल्यानंतर बुमराहने त्याला खास शैलीत चिडवलं. यामागची गोष्ट अशी की, याआधीच्या सामन्यात हरिस रौफने विमान पाडल्यासारखा इशारा करून जल्लोष केला होता. यावेळी बुमराहने त्याला आऊट करत, तसेच उत्तर देत सेलिब्रेशन केलं. हरिस रौफ 4 चेंडूत एक चौकाराच्या मदतीने सहा धावा करून बाद झाला.

हे ही वाचा –

Ind vs Pak Final Asia Cup 2025 : आशिया कप फायनलच्या टॉस वेळीही ड्रामा! पाकिस्ताननं बोलावला स्वतःचा ब्रॉडकास्टर, नेमकं काय घडलं? पाहा Video

आणखी वाचा

Comments are closed.