आशिया कपवर विजयाचा ‘तिलक’! आपल्या पोरांनी मॅच काढली, फायनलमध्ये पाकिस्तानला लोळवत जिंकली ‘ट्रॉफ


भारताने एशिया चषक 2025 ने पाकिस्तानच्या अंतिम सामन्यात विजय मिळविला: भारताने अखेर आशिया कप 2025 जिंकत पाकिस्तानचं तोंड बंद केलं आहे. तिलक वर्माच्या तुफानी खेळीमुळे आशिया कपच्या फायनलमध्ये पाकिस्तानला संघाला लोळवत, टीमने विजेतेपद पटकावले. आधी भारताने पाकिस्तानला 147 धावांत रोखले. भारतीय संघ विजयासाठी 148 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला आणि त्याानंतर आशिया कपमध्ये आतापर्यंत शानदार फलंदाजी करणारा अभिषेक शर्मा भारतीय डावाच्या दुसऱ्या षटकात 5 धावा काढून बाद झाला, पण त्यानंतर तिलक वर्माचा शो सर्वांना पाहायला मिळाला. कारण तिलक वर्मा आणि शिवम दुबेने एकहाती फटकेबाजी केली आणि भारताला सामना जिंकवून देण्यात (India Won Asia Cup 2025) मोलाचा वाटा उचलला.

पाकिस्तानचा डाव 146 धावांवर संपला

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीस उतरलेल्या पाकिस्तान संघाने चांगली सुरुवात केली होती. त्यांचा पहिला गडी 84 धावांवर गेला, जेव्हा साहिबजादा फरहान 57 (38) धावा करून माघारी परतला. पण त्यानंतर मात्र पाकिस्तानची फलंदाजी कोलमडली. फरहानची खेळी ही पाकिस्तानसाठी सर्वात मोठी ठरली. त्याच्याशिवाय फक्त दोन फलंदाज दहाच्या पुढे धावा करू शकले. फखर जमन 46(35) तर सैम अयूब 14(11) धावा करून बाद झाले. उरलेल्या फलंदाजांत तिघे शून्यावर परतले. कर्णधार सलमान अली आगा 8, हुसैन तलत 1, मोहम्मद नवाज 6 आणि हारिस रऊफ 6 धावा करून बाद झाले. अशा प्रकारे पाकिस्तानचा डाव 146 धावांवर संपला.

कुलदीप यादवी तुर्की जादू

कुलदीप यादवने अप्रतिम गोलंदाजी करत पाकिस्तानची कंबर मोडली. 84 धावांवर पहिले यश मिळाल्यानंतर पाकिस्तानचा संपूर्ण डाव 146 वर गुंडाळला. त्याने 4 षटकांत 30 धावा देत 4 गडी बाद केले. कुलदीप यादवसह अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 2-2 गडी बाद केले.

हे ही वाचा –

Suryakumar Yadav Ind vs Pak Final : सूर्यकुमार यादव OUT की नॉट OUT? सलमान आगाने घेतलेला कॅच वादात! पंचाचा निर्णय तुम्हीच पाहा आणि ठरवा, VIDEO

आणखी वाचा

Comments are closed.