हिंदुस्थानला वठणीवर आणावेच लागेल! अमेरिकेच्या वाणिज्य मंत्र्यांनी दिली धमकी

हिंदुस्थान आणि अमेरिकेमध्ये व्यापार करारासाठी वाटाघाटी सुरू असताना अमेरिकेने दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेचे वाणिज्यमंत्री होवार्ड लुटनिक यांनी हिंदुस्थानला वठणीवर आणण्याची भाषा केली आहे. ’अमेरिकेत माल विकायचा असेल तर हिंदुस्थानला डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी जुळवून घ्यावेच लागेल,’ असा इशारा त्यांनी दिला.
‘स्वित्झर्लंड, ब्राझील, हिंदुस्थान सारख्या काही देशांशी आमचे मतभेद आहेत. त्यांना वठणीवर आणण्याची गरज आहे. हिंदुस्थानने अमेरिकेला योग्य प्रतिसाद देण्याची गरज आहे. हिंदुस्थानने त्यांची बाजारपेठ खुली करायला हवी. अमेरिकेच्या हिताला बाधक होतील असे निर्णय घेऊ नयेत, अशी अपेक्षा लुटनिक यांनी व्यक्त केली.
Comments are closed.