दिल्ली विमानतळ आणि शाळांमध्ये बॉम्बच्या धमक्या
जम्मू विमानतळावरही धमकीमुळे अलर्ट जारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, श्रीनगर
दिल्ली विमानतळ, विविध शाळा आणि इतर संस्थांना रविवारी ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली. या धमकीनंतर बॉम्ब पथके आणि श्वान पथके तैनात करून तपासणी करण्यात आली. मात्र, कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नसल्याने सुटकेचा नि:श्वास टाकण्यात आला. मात्र, या धमकीनंतर सुरक्षा यंत्रणांची बरीच धावपळ उडाली. तपासणीनंतही विमानतळावरील प्रवाशांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात होते. तसेच शाळांमध्येही कसून तपासणी करण्यात आली. दिल्लीतील या धमकीपूर्वी रविवारी सकाळी जम्मू विमानतळ प्रशासनालाही एक ईमेल पाठवून एका खासगी विमान कंपनीला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. तथापि, तपासानंतर, तपास पथकाला काहीही सापडले नाही. यापूर्वी, 13 सप्टेंबर रोजी दिल्ली आणि मुंबई उच्च न्यायालयांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या. दिल्ली आणि मुंबई व्यतिरिक्त 11 सप्टेंबर रोजी बिहारमध्येही बॉम्बस्फोटाच्या धमक्या देण्यात आल्या होत्या.
Comments are closed.