भारताने पाकिस्तानला लोळवलं, फायनलमध्ये रोमांचक विजय; PM मोदी म्हणाले- 'निकाल तोच….!

दुबईत खेळवण्यात आलेल्या आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला 5 विकेट्सने पराभूत करून इतिहास रचला. 147 धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांच्या अर्धशतकीय भागीदारीमुळे भारताचा डाव मजबूत झाला. अंतिम ओव्हरमध्ये रिंकू सिंगच्या विजयी शॉटने भारताने सामना जिंकला आणि आशिया चषकावर आपले नववे नाव कोरले.

भारताच्या या विजयाबद्दल देशभरात उत्साहाची लाट पसरली आहे. भारतीय संघाचे अभिनंदन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत ट्विट केले:

नाणेफेक हरल्यानंतर पाकिस्तानची फलंदाजी आक्रमक सुरू झाली. साहिबजादा फरहान (57) वगळता इतर फलंदाज जास्त धावा करू शकले नाहीत. फखर जमन 46, सलमान अली आगा 8, हुसैन तलत 1, मोहम्मद नवाज 6 आणि हारिस रौफ 6 धावा करून बाद झाले. अखेरीस पाकिस्तानचा डाव 146 धावांवर संपला.

भारताची सुरुवात काहीशी ढासळली; दुसऱ्याच ओव्हरमध्येच अभिषेक शर्मा आऊट झाला आणि सूर्यकुमार यादवही 5 चेंडूत फक्त 1 धाव करून बाद झाला. मात्र संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी अर्धशतकीय भागीदारी करून डाव सावरला. 13व्या षटकामध्ये संजू सॅमसन (24) बाद झाला. त्यानंतर शिवम दुबे आणि तिलक वर्मा यांनी पुन्हा एकदा अर्धशतकीय भागीदारी करून भारताला विजयी स्थितीत आणले.

अशिया कपचा पारितोषिक वितरण सोहळाही नाट्यमय ठरला. भारतीय संघाने ACC अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला, तरी वैयक्तिक पारितोषिके स्वीकारली. पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा उपविजेतेपदासाठी धनादेश स्वीकारला, मात्र भारतीय संघ शेवटपर्यंत ट्रॉफी नाकारण्याच्या निर्णयावर ठाम राहिला.

Comments are closed.