पाकिस्तानला हरवल्यानंतर बीसीसीआयची मोठी घोषणा, ACC कडून फक्त 2.4 कोटी रुपये मिळाले, पण प्राईस म


पाकिस्तान एशिया कप फायनल 2025 मध्ये भारताने पराभूत केले: दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर (Ind vs Pak Asia Cup Final) पाच गडी राखून पराभव करत विजय मिळवला. या विजयासह भारताने विक्रमी नवव्यांदा आशिया कपचं जेतेपद पटकावलं. पाकिस्तानविरुद्धचा हा रोमांचक सामना भारताने अखेरच्या 2 चेंडू बाकी असतानाच जिंकला. या ऐतिहासिक विजयाबरोबरच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) संघासाठी मोठ्या बक्षिसाची घोषणा केली.

बीसीसीआयची मोठी घोषणा (BCCI Announces Prize Money As India Beat Pakistan)

बीसीसीआयने खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला तब्बल 21 कोटी रुपयांचं बक्षीस देणार असल्याचं जाहीर केलं. भारतीय क्रिकेटच्या सुवर्ण इतिहासातली ही आणखी एक महत्त्वपूर्ण उपलब्धी ठरली. बीसीसीआयने X वर लिहिलं की, “3 झटके. 0 उत्तर. आशिया कप चॅम्पियन्स. संदेश स्पष्ट आहे. टीम आणि सपोर्ट स्टाफसाठी 21 कोटी रुपयांचं बक्षीस.”

भारताने पाकड्यांना हरवले, तरी पैशांचा पाऊस!

भारताने आशिया कप 2025 फायनलमध्ये पाकिस्तानला 5 विकेटने पराभूत केले. या विजयामुळे भारताला 3 लाख अमेरिकन डॉलर्सचा बक्षीस मिळाले, जे भारतीय चलनात सुमारे 2.6 कोटी रुपये होतो. फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतरही पाकिस्तान रिकाम्या हाताने परतले नाही; त्यांना रनर-अप म्हणून 1.5 लाख अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस मिळाले. पण प्राईस मनीच्या दहापट पैसे बीसीसीआयने खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला जाहीर केला.

आशिया कप अंतिम सामन्यातील पुरस्कार

  • गेम चेंजर – शिवम दुबे – 3500 डॉलर्स
  • सर्वाधिक षटकार – तिलक वर्मा – 3500 डॉलर्स
  • फायनलचा सर्वोत्कृष्ट खेळाडू – तिलक वर्मा – 5000 डॉलर्स
  • मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर – कुलदीप यादव – 15000 डॉलर्स
  • मालिकेचा खेळाडू – अभिषेक शर्मा – 15000 डॉलर्स

टिळक वर्माची टुफानी

या सामन्यात तिलक वर्माने (Tilak Verma) जबरदस्त फलंदाजी केली. त्याने 53 चेंडूत नाबाद 69 धावा ठोकल्या. अवघ्या 22 वर्षांच्या तिलकने दबावात संयम राखून डाव सावरला. 147 धावांचं लक्ष्य गाठताना त्याने भारताचा डगमगलेला डाव सांभाळला. शिवम दुबेसोबत त्याने 60 धावांची मॅच-विजयी भागीदारी रचली. भारताची अवस्था 20 धावांवर 3 आणि नंतर 77 धावांवर 4 बाद अशी बिकट झाली होती. मात्र तिलकने धीर सोडला नाही. त्याने 3 चौकार आणि 4 षटकार ठोकत अप्रतिम खेळी केली.

कुलदीप यादवची जादुई गोलंदाजी

याआधी कुलदीप यादवने गोलंदाजीत कहर केला. त्याने 4 गडी बाद करत केवळ 30 धावा दिल्या. पाकिस्तानची अवस्था एका टप्प्यावर 113 धावांवर 1 गडी अशी भक्कम होती. पण कुलदीपच्या फिरकीनं पाकिस्तानच्या मधल्या फळीला पुरता उध्वस्त केलं. 17व्या षटकात त्याने एकट्यानं 3 गडी टिपले. परिणामी पाकिस्तानचा डाव 19.1 षटकांत 146 धावांत गडगडला. पाकिस्तानकडून साहिबजादा फरहानने 57 आणि फखर झमानने 46 धावा केल्या.

आणखी वाचा

Comments are closed.