पाकिस्तानचा मंत्री ट्रॉफी घेऊन झटपट पळाला; टीम इंडियाच्या खेळाडूंनी काय केलं?, Video आला समोर
एशिया कप ट्रॉफी इंड. वि पीएके फायनल: आशिया चषक स्पर्धेच्या (Ind vs Pak Asia Cup Final) काल (28 सप्टेंबर) झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. या मालिकेत भारतीय संघाने तिसऱ्यांदा पाकिस्तानला धूळ चारली आहे. तिलक वर्माच्या (Tilak Verma) नाबाद 69 धावांच्या जोरावर टीम इंडियाने (Team India) एकावेळी अशक्यप्राय वाटत असलेला विजय प्राप्त केला. दरम्यान, आशिया चषकाच्या अंतिम सामन्यानंतर जवळपास 70-80 मिनिटं ट्रॉफी देण्यावरुन (Asia Cup Trophy Controversy) राडा झाला.
एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी (Mohsin Naqvi) हे पाकिस्तानचे गृहमंत्री आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षही आहेत. त्यामुळेच भारतीय संघानं मोहसीन नक्वी यांच्या हस्ते आशिया चषक आणि वैयक्तिक पदकं स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. भारतीय संघाच्या या जिद्दानंतरही मोहसीन नक्वी देखील ट्रॉफी देण्यासाठी हट्ट करत होते. त्यानंतर ट्रॉफी न घेण्याचा निर्णय भारतीय संघाने घेतला. शेवटपर्यंत भारतीय संघाने ट्रॉफी घेतली नाही. अखेर ट्रॉफी न घेताच भारतीय संघाने सेलिब्रेशन केले. त्यानंतर मोहसीन नक्वी ट्रॉफी आणि भारतीय खेळाडूंचे सर्व मेडल घेऊन निघून हॉटेलमध्ये (Asia Cup Trophy Controversy) गेले. जेव्हा मोहसीन नक्वी मैदानातून निघाले, त्यादरम्यानचा 2 मिनिटांचा व्हिडीओ आता समोर आला आहे. मोहसीन नक्वी मैदान सोडून जात असताना दुसऱ्या बाजूला भारतीय संघाचे सर्व खेळाडू उभे होते.
भारताला पराभूत झाल्यानंतर मोहसीन नकवी दुबईच्या मैदानापासून कसे पळत आहे 😂🤮#Indvspak #ASIACUPFINAL#MOHSINNAQVI #ट्रॉफी#INDVSPAK2025 #क्रिकेट#ऑपरेशन्सइंडूर
pic.twitter.com/nyyd9gggy– विश्वजित ठाकूर (@थाकुरविश 80259) 28 सप्टेंबर, 2025
कोण आहे मोहसीन नक्वी? (Who Is Mohsin Naqvi)
मोहसीन नक्वी सध्या एसीसीचे अध्यक्ष, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) प्रमुख आणि पाकिस्तानचे गृहमंत्री आहेत. ते कट्टर भारतविरोधी भूमिकेसाठी कुप्रसिद्ध आहेत. अनेकदा त्यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याविरोधात आक्रमक व्यक्तव्य केली आहेत.
भारताचा 5 विकेट्सने दणदणीत विजय- (Team India Over Pakistan)
पाकिस्तानने विजयासाठी दिलेल्या 147 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात काहीशी खराब झाली. दुसऱ्या ओव्हरमध्येच इनफॉर्म बॅट्समन अभिषेक शर्मा आऊट झाला. फहीम अशरफने त्याला आऊट केले. शुभमन गिलने 10 चेंडूत 12 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादव या सामन्यातही फ्लॉप राहिला, 5 चेंडूत फक्त 1 रन करून आऊट झाला. यानंतर संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी अर्धशतकीय भागीदारी करत भारताचा डाव सावरला. मात्र 13व्या ओव्हरमध्ये अबरारने संजू सॅमसन (24) ला आऊट केले. यानंतर शिवम दुबे आणि तिलक वर्मा यांनी पुन्हा एक अर्धशतकीय भागीदारी केली. एक टप्प्यावर भारताला जिंकण्यासाठी फक्त 2 ओव्हरमध्ये 17 धावा लागत होत्या. अंतिम ओव्हरमध्ये 10 धावा हव्या होत्या आणि विजयी शॉट रिंकू सिंगने मारत भारताने सामना जिंकला. या सामन्यात भारतासाठी तिलक वर्माने 53 चेंडूत 69 नाबाद धावा केल्या त्याने 3 चौकार आणि 4 षटकार मारले आणि भारतीय विजयाचा शिलेदार ठरला.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.