मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन गेला पळून, कोच गौतम गंभीरचं 6 शब्दात ट्विट, म्हणाला, शेवटी…


गौतम गार्बीर प्रतिक्रिया: भारतीय क्रिकेट संघाने आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला पुन्हा एकदा पराभूत करत नऊव्यांदा किताब पटकावला. पाकिस्तानी संघ 20 षटकांत 146 धावांत गारद झाला. त्यानंतर विद्यमान विजेता भारताने 5 गडी गमावून लक्ष्य सहज गाठले. शेवटच्या षटकात 10 धावांची गरज असताना तिलक वर्माने (Tilak Varma Ind vs Pak Final) हरिस रौफच्या चेंडूला मिडविकेट स्टँडमध्ये षटकार मारला आणि त्यानंतर रिंकू सिंगने चौकार मारत भारताला विजय मिळवून दिला. यादरम्यान, अंतिम सामना झाल्यानंतर ट्रॉफीवरुन मैदानात जोरदार राडा झाला.

गौतम गंभीरचं 6 शब्दात ट्विट (Gautam Gambhir Reaction)

या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पाकिस्तानवर टोला मारत एक पोस्ट केली, ती सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी गौतम गंभीर यांनी सोशल मीडियावर फक्त सहा शब्दांत एक ट्विट केले. गंभीर यांनी X (ट्विटर) वर लिहिलं की, “In the end, INTENT always wins.” गंभीरांचा हा संदेश थोडक्यात, पण अचूकपणे प्रतिस्पर्ध्याला उत्तर देणारा ठरला. बाह्य गोष्टींकडे दुर्लक्ष करून, त्यांनी खेळामध्ये खरी जिंकणारी गोष्ट म्हणजे इरादा (INTENT) हेच असल्याचं ठळकपणे दाखवून दिलं.

मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन गेला पळून…  (Mohsin Naqvi Runs Away With Asia Cup Trophy)

दरम्यान, आशिया कपचा अंतिम सामना झाल्यानंतर ट्रॉफीवरुन मैदानात जोरदार राडा झाला. एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी (Mohsin Naqvi) हे पाकिस्तानचे गृहमंत्री आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे मोहसीन नक्वीच्या हस्ते आशिया कपमध्ये जेतेपद पटकावणाऱ्या संघाला ट्रॉफी दिली जाणार होती. मात्र भारतीय संघाने मोहसीन नक्वीच्या हस्ते ट्रॉफी घेण्यास नकार दिला. त्यानंतर साधारण 70-80 मिनिटं नाट्यमय गदारोळ झाला.

भारतीय खेळाडूंनी आपली वैयक्तिक पारितोषिकं अन्य मान्यवरांच्या हस्ते स्वीकारली. पण पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगानं उपविजेतेपदाचा धनादेश एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते स्वीकारला. त्यानंतर मोहसीन नक्वी आशिया चषकाची ट्रॉफी आणि भारतीय खेळाडूंची मेडल्स घेऊन मैदानातून (Asia Cup Trophy Controversy) निघून गेला.

हे ही वाचा –

Mohsin Naqvi On Narendra Modi Post: पहिले ट्रॉफी घेऊन पळाला, आता नरेंद्र मोदींच्या पोस्टवर मोहसीन नक्वीच ट्विट, काय म्हणाला?

आणखी वाचा

Comments are closed.