जगात दुसऱ्या क्रमांकाची कमी उंचीची मुलगी चंद्रपूर जिल्ह्यात; विक्रमाची नोंद, प्रमाणपत्र बहाल

चंद्रपुर-गेट-रीकॉग्निशन-सर्टिफिकेट वर्ल्ड्स-सेकंद-शॉर्टस्ट-गर्ल

जगात दुसऱ्या क्रमांकाची ठेंगणी मुलगी चंद्रपूर जिल्ह्यात आढळली. दोन फूट तीन इंच एवढी तिची उंची आहे. त्यामुळे तिची नोंद आता International Book of records मध्ये झाली आहे.

राजेश्वरी गुणेदार असे या मुलीचे नाव असून, ती चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात परसोडी येथील रहिवासी आहे. काही युवकांना ती रस्त्याच्या कडेला चालताना दिसली. तिची उंची बघून त्यांना आश्चर्य वाटले. तिची विचारपूस केली, माहिती घेतली. उंची मोजली. तेव्हा लक्षात आले की, जिवंत असलेल्या व्यक्तींमध्ये तिची उंची जगात दुसऱ्या क्रमांकाची आहे. त्यामुळे तिची कुठेतरी नोंद व्हायला हवी आणि तिला ओळख प्राप्त व्हावी, या उद्देशाने त्या युवकांनी International Book of records कडे कागदोपत्री पाठपुरावा केला. त्यात त्यांना यश मिळाले. जरी तिची उंची जगात दुसऱ्या क्रमांकाची असली, तरी तिची नोंद जागतिक संस्थेने घेत तिला प्रमाणपत्र बहाल केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते तिला हे प्रमाणपत्र देण्यात आले.

Comments are closed.