भारत पाकिस्तान पु्न्हा आमने सामने येणार, महिला वनडे वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ भिडणार


नवी दिल्ली : भारतानं अंतिम फेरीच्या लढतीत पाकिस्तानला पराभूत करत आशिया चषक नवव्यांदा जिंकला आहे. ही स्पर्धा संपल्यानंतर 30 सप्टेंबरपासून महिला वनडे वर्ल्ड कप सुरु होणार आहे.  30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत 8 संघ सहभागी होणार  आहेत. या महिला वनडे वर्ल्ड कपचा सलामीचा सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे. ही मॅच 30 सप्टेंबरला होणार आहे. महिला वनडे वर्ल्ड कप राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे, त्यामुळं या वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार आहे.

महिला वनडे वर्ल्ड कप 2025 राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत 8 संघ लीग स्टेजमध्ये  एकदा आमने सामने येतील. गुणतालिकेतील पहिले चार संघ नॉकआऊट साठी क्वालिफाय करतील. त्यानंतर सेमी फायनल आणि त्यानंतर फायनल होईल.  फायनल 2 नोव्हेंबरला होणार आहे.

Womens World Cup India Schedule : महिला वनडे वर्ल्डकपमध्ये भारताचं वेळापत्रक

भारताचा संघ 30 सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. तर, 5 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार आहेत. यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका 9  ऑक्टोबरला, 12 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया, 19 ऑक्टोबरला इंग्लंड विरुद्ध भारताचा सामना होईल.  23 ऑक्टोबरला न्यूझीलंड विरुद्ध आणि 26 ऑक्टोबरला भारत आणि बांगलादेश आमने सामने येतील.

30 सप्टेंबर- भारत विरुद्ध श्रीलंका

5 ऑक्टोबर- भारत विरुद्ध पाकिस्तान

9 ऑक्टोबर- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

12 ऑक्टोबर- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

19 ऑक्टोबर- भारत विरुद्ध इंग्लंड

23 ऑक्टोबर- भारत विरुद्ध न्यूझीलंड

26 ऑक्टोबर- भारत विरुद्ध बांगलादेश

भारत दोन वेळा अंतिम फेरीत

महिला वनडे वर्ल्ड कपची सुरुवात 1973 मध्ये झाली होती. त्यानंतर 12 वेळा महिला वर्ल्ड कप स्पर्धा खेळवली आहे. ज्यामध्ये भारतानं दोन वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला होता. 2005 मध्ये ऑस्ट्रेलियानं अंतिम फेरीत 98 धावांनी भारताचा पराभव केला होता. तर, 2017 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडनं भारताचा 9 धावांनी पराभव केला होता.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.