विंडीजचा संघ आणखीन दुबळा, वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफही बाहेर

आधीच कमकुवत असलेल्या वेस्ट इंडीज संघाची हिंदुस्थान दौऱ्यापूर्वी आणखी बिकट अवस्था झाली आहे. दोन दिवसांपूर्वी शामर जोसेफला दुखापतीमुळे मालिकेतून माघार घ्यावी लागली होती, तर मालिकेच्या तोंडावर वेस्ट इंडीज क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफलाही पाठदुखीमुळे दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडावे लागले आहे. आता त्याच्या जागी जेडिया ब्लेड्सला संधी देण्यात आली आहे. या दोन धक्क्यानंतर वेस्ट इंडीजकडे वेगवान गोलंदाजीमध्ये जेडन सील्स आणि अँडरसन फिलिप यांच्यावर भिस्त आहे. ऑलराउंडर जस्टिन ग्रीव्ह्स आणि कर्णधार रोस्टन चेसलाही गोलंदाजीची जबाबदारी सांभाळावी लागेल. फिरकीची सूत्रे जॉमेल वॉरिकन आणि खेरी पियरे यांच्या हाती असतील.
हिंदुस्थान आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना 2 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर, तर दुसरा सामना 10 ऑक्टोबरला नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
Comments are closed.