पाळीव प्राण्यांना जवळ घेणं, किस करणं किती सुरक्षित? वाचा गंभीर परिणाम
बऱ्याच प्राणीप्रेमींच्या घरी पाळीव प्राणी असतात. हे लोक आपल्या प्राण्यांना अगदी घरातील सदस्याप्रमाणे ठेवतात. म्हणजेच त्यांचे लाड करणे, त्यांना जवळ घेणे, त्यांना किस करणे. ही सर्व उदाहरणे आपण आपल्या आजूबाजूला पाहतो. पण हे करण्यापूर्वी तुम्ही काळजी घेणे गरजेचे आहे. म्हणजेच एका संशोधनातून असे समोर आले आहे की, जर तुम्ही पाळीव प्राण्यांना किस केले तर अनेक प्रकारचे गंभीर आजार होण्याची शक्यता असते.
पाळीव प्राण्यांना जवळ घेतल्यास किंवा किस केल्यास झुनोटिक ट्रान्समिशन या आजाराचा धोका असतो. कारण त्यांच्या लाळेत आणि तोंडात हानिकारक जीवाणू असू शकतात जे मानवांच्या तोंडात गेल्यास रोग निर्माण करणारे ठरतात. प्राण्यांच्या लाळेत साल्मोनेला, पाश्चुरेला आणि बार्टोनेलासारखे जंतू असू शकतात. हे जंतू मानवाच्या तोंडात गेल्यास संसर्ग, पोटाच्या समस्या यासह गंभीर आजार होण्याची शक्यता असते.
कुत्र्याच्या तोंडात आणि लाळेमध्ये कॅपनोसाइटोफागा बॅक्टेरिया असतो. जो त्यांच्या संपर्कात आल्यानंतर किंवा कुत्र्याच्या चावण्याद्वारे लोकांमध्ये प्रसारित होऊ शकतो. यामुळे प्रत्येकालाच धोका असतो असे नाही. मात्र रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असलेल्या लोकांना धोका असू शकतो. यामुळे गंभीर आजार होण्याची शक्यता असते.
जर तुम्ही तुमच्या पाळीव कुत्र्याला कच्चे मांस खायला दिले तर चुकूनही त्याला किस करू नका. कच्चे मांस खाल्ल्याने कुत्र्यांच्या तोंडात साल्मोनेलासारखे आजार होण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत कच्चे मांस खाणाऱ्या कुत्र्याला किस तुम्हीलाही हा आजार होण्याचा धोका संभवतो.
मांजरीच्या विष्ठा-तोंडाच्या मार्गाने आजार पसरतात. मांजरीच्या विष्ठेचा ट्रे हाताळ्यानंतर आपले हात धुणे किंवा हातमोजे वापरणे महत्वाचे आहे. तसेच मांजरींच्या चाव्याव्दारे आणि ओरखड्यांद्वारे देखील संक्रमण होऊ शकते.
हे महत्त्वाचे:
- पाळीव प्राण्यासोबत खेळल्यानंतर, त्यांची विष्ठा साफ केल्यानंतर हात धुवा.
- पाळीव प्राण्यांना तुमचा चेहरा किंवा उघड्या जखमा चाटू देऊ नका.
- पाळीव प्राण्यांना स्वयंपाकघरात येऊ देऊ नका.
- पाळीव प्राणी आजारी असल्यास पशुवैद्याकडे घेऊन जा.
Comments are closed.