पाकिस्तान-व्यापलेल्या काश्मीरमधील हिंसक निषेध
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पाकिस्तान सरकारच्या अन्यायाविरोधात पाकव्याप्त काश्मीरमध्ये उग्र निदर्शने होत असून तेथील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाकिस्तानातील शहाबाझ शरीफ सरकारने पाकव्याप्त काश्मीरमध्ये अत्याचार चालविले आहेत. स्थानिक जनतेला जीवन जगणे असह्या झाले आहे. तसेच या भागातील नैसर्गिक स्रोतांचे शोषण पाकिस्तान सरकारकडून होत आहे. त्यामुळे हजारो लोक रस्त्यांवर उतरत असून त्यांनी पाकिस्तानपासून आम्हाला स्वातंत्र्य हवे आहे, अशी मागणी केली आहे. आंदोलकांनी ‘शटर डाऊन, व्हील जाम’ आंदोलन हाती घेतल्याने या भागातले सर्व व्यवहार आणि प्रशासन ठप्प झाले आहे.
गेल्या अनेक वर्षांमधील सर्वात उग्र निदर्शने सध्याच्या काळात या प्रदेशात होत आहेत. विविध संघटनांनी आवामी कृती समितीची स्थापना केली असून या समितीच्या माध्यमातून ही आंदोलने आणि निदर्शने करण्यात येत आहेत. त्यामुळे हादरलेल्या पाकिस्तान सरकारने या भागात मोठ्या प्रमाणावर लष्कर स्थापित केले असून त्यामुळे तणावात आणि स्थानिक नागरीकांच्या असंतोषांमध्ये अधिकच भर पडली आहे. वायव्य सरहद्द प्रांत आणि खैबर पख्तुनख्वा या प्रांतांमध्ये जशी परिस्थिती निर्माण झाली आहे, तशीच पाकव्याप्त काश्मीरमध्येही सध्या आहे.
सरकारचा अधिकार मानण्यास नकार
पाकव्याप्त काश्मीरवर पाकिस्तान सरकारचा अधिकार मानण्यास येथील स्थानिक जनतेने विरोध केला आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भाग काश्मीरच्या संस्थानाचा होता. भारताला स्वातंत्र्य मिळताना हे संस्थान भारत किंवा पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये समाविष्ट झाले नव्हते. पण काश्मीचे महाराज हरीसिंग यांनी भारतात समविष्ट होण्याची इच्छा व्यक्त केली होती. तथापि, पाकिस्तानने काश्मीरवर हल्ला करुन ते गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी भारताने सेना पाठवून पाकिस्तानला रोखले होते. तथापि, पूर्ण काश्मीर मुक्त करण्याची संधी असतानाही त्यावेळचे नेते नेहरु यांनी जिंकत असलेल्या भारताच्या सेनेला माघारी बोलाविले होते. त्यामुळे काश्मीरचा निम्म्याहून अधिक भाग पाकिस्तानच्या ताब्यात आहे. आज याच भागातून भारतात मोठ्या प्रमाणात दहशतवादी येत आहेत.
Comments are closed.