डीयूएसयू माजी अध्यक्षांना धमक्या

पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्ली विद्यापीठ (डीयू) विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष रौनक खत्री यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यांनी स्वत: ही माहिती उघड केली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ही धमकी कुख्यात रोहित गोदारा यांनी दिली होती. टोळीशी संबंधित एका व्यक्तीने रौनकच्या व्हॉट्सअॅपवर 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. रौनक खत्री यांना व्हॉट्सअॅपवर वारंवार धमकीचे संदेश आणि कॉल येत होते. ‘मला 5 कोटी रुपये द्या नाहीतर मरण्यास तयार रहा’ असा हा संदेश परदेशी नंबरवरून आल्याचे खत्री यांनी पोलिसांना सांगितले.

फोन करणाऱ्याने रौनक खत्री यांना हॉट्सअॅपवर अनेकवेळा फोन केला. मात्र, रौनकने प्रतिसाद न दिल्याने तो माणूस खवळला. ‘जर तू फोन उचलला नाहीस तर गोळी झेलण्यास तयार रहा’ अशी धमकी मिळाल्याचे रौनकने पोलिसात  दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. मागणी पूर्ण न झाल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा पाठवणाऱ्याने दिला आहे.

Comments are closed.