धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी मध्य रेल्वेच्या 20 विशेष गाडय़ा

धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी नागपूरला जाणाऱ्या प्रवाशांची सोय व्हावी म्हणून मध्य रेल्वेमार्फत 20 विशेष गाडय़ा चालवण्यात येणार आहेत. धम्मचक्र प्रवर्तन दिन हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956मध्ये अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारलेला ऐतिहासिक दिवस आहे. या दिवशी त्यांचे अनुयायी अभिवादन अर्पण करतात. संबंधित प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने विशेष गाडय़ांची व्यवस्था केली आहे.

1 ऑक्टोबर ते 4 ऑक्टोबर यादरम्यान विशेष गाडय़ा चालवण्यात येणार आहेत. त्यामध्ये नागपूर-अकोला-नागपूर विशेष (2 सेवा), छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अनारक्षित विशेष (2 सेवा), पुणे-नागपूर-पुणे अनारक्षित विशेष (2 सेवा), सोलापूर-नागपूर-सोलापूर अनारक्षित विशेष (2 सेवा), नागपूर-भुसावळ-नागपूर अनारक्षित विशेष (6 सेवा), नाशिक रोड-नागपूर-नाशिक रोड मेमू अनारक्षित विशेष (2 सेवा), नाशिक रोड-नागपूर-नाशिक रोड मेमू अनारक्षित विशेष (4 सेवा) या गाडय़ांचा समावेश आहे. विशेष गाडय़ांचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर खुले आहे, असे मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले.

Comments are closed.