इथेनॉलच्या आरोपावर नितीन गडकरींचं उत्तर म्हणाले, शक्तिशाली लॉबी माझी बदनामी करतेय; काही उद्योगप
नवी दिल्ली : भाजप नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याबाबत त्यांच्यावर होत असलेले आरोप फेटाळून लावले आहेत. त्याचबरोबर याबाबत बोलताना त्यांनी म्हटलं की, माझ्या निर्णयामुळे नाराज झालेली एक शक्तिशाली आयात ‘लॉबी’ हे आरोप करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. कच्च्या तेलाच्या आयातीमुळे जवळपास २२ लाख कोटी रुपये देशाबाहेर जात होते. काही लोकांच्या व्यवसायांना या निर्णयाचा फटका बसला आणि ते रागाने बदनामी करू लागते आहेत. मी आजवर कुठल्याही ठेकेदाराकडून एक पैसाही घेतलेला नाही. त्यामुळे ठेकेदार माझ्यापासून घाबरतात, असे गडकरी (nitin gadkari) म्हणाले. (Nitin Gadkari on ethanol blending decision)
पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याबाबतच्या त्यांच्यावरील आरोपांवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अखेर मौन सोडले आहे. गडकरी यांनी सोमवारी म्हटले की, हे त्यांच्या निर्णयांवर नाराज असलेल्या एका शक्तिशाली आयात लॉबीचे काम आहे.
Nitin Gadkari: याकडे दुर्लक्ष करणे चांगले
स्वतःची तुलना “फळ देणाऱ्या झाडाशी” करताना गडकरी म्हणाले, “मी अशा टीकेला उत्तर देत नाही कारण असे केल्याने बातम्या बनतात. लोक फळ असलेल्या झाडावर दगड फेकतात. याकडे दुर्लक्ष करणे चांगले.”
Nitin Gadkari: या निर्णयामुळे कोणाचे नुकसान झाले?
गडकरी म्हणाले की त्यांचे धोरण इथेनॉल मिश्रणाला प्रोत्साहन देणे, शेतकऱ्यांना ऊर्जा उत्पादक बनवणे आणि प्रदूषण कमी करणे यावर केंद्रित आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या धोरणामुळे इंधन आयातीत निहित हितसंबंध असलेल्यांना थेट नुकसान झाले असा दावा त्यांनी केला.
Nitin Gadkari: माझ्याविरुद्ध पैसे देऊन बातम्या दिल्या…
गडकरी म्हणाले, “कच्च्या तेलाच्या आयातीतून देशातून सुमारे २२ लाख कोटी रुपये बाहेर जात होते. या निर्णयामुळे काही लोकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आणि ते संतप्त झाले आणि माझ्याविरुद्ध बातम्या प्रसारित करण्यासाठी पैसे देऊ लागले.” ते म्हणाले, ‘आजपर्यंत मी कोणत्याही कंत्राटदाराकडून एक पैसाही घेतलेला नाही, त्यामुळे कंत्राटदार मला घाबरतात.’
Nitin Gadkari: सत्य समोर येईल
गडकरी यांनी आरोपांना राजकारणाचा भाग ठरवत आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगितले. “मी कधीही कोणत्याही ठेकेदाराकडून एक पैसाही घेतलेला नाही, म्हणूनच ते माझ्यापासून घाबरतात. लोकांना सत्य माहिती आहे आणि यापूर्वीही मी अशा परिस्थितींचा सामना केलेला आहे,” असे गडकरी म्हणाले. विश्लेषकांच्या मते, सीआयएएन अॅग्रोची वाढ ही केवळ इथेनॉल विक्रीमुळेच नव्हे, तर नव्या व्यवसाय आणि इतर उत्पन्न स्रोतांमुळेही झाली आहे.
Nitin Gadkari: त्यांच्या मुलाच्या कंपनीबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आले
गडकरी यांचे हे विधान त्यांचे पुत्र निखिल गडकरी यांच्याकडून चालवल्या जाणाऱ्या CIAN अॅग्रो इंडस्ट्रीजच्या महसुलात आणि नफ्यात झालेल्या तीव्र वाढीबद्दल सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे आहे. ही कंपनी इथेनॉल उत्पादन व्यवसायाबाबत आहे. त्यांचा मुलगा निखिल गडकरी यांची कंपनी सीआयएएन अॅग्रो इंडस्ट्रीजच्या झपाट्याने वाढलेल्या कमाईवर प्रश्न उपस्थित होत आहेत. एथेनॉल व्यवसायाशी संबंधित या कंपनीचे उत्पन्न एप्रिल- जून 2025 मध्ये वाढून 510.8 कोटी रुपये झाले, तर एक वर्षापूर्वी ते केवळ 17.47 कोटी रुपये होते. इतकेच नव्हे तर कंपनीचा नफा अत्यल्प स्तरावरून 52 कोटी रुपयांहून अधिक झाला. शेअर बाजारातही या कंपनीच्या शेअर्सची किंमत 172 रुपयांवरून वाढून 2,023 रुपये इतकी झाली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.