आधी दोनदा हस्तांदोलन केलं, सूर्यकुमारवर माझा राग नाही, पण…; सलमान अली आगाचा खळबळजनक दावा

द्रुत वाचन दर्शवा

एआय द्वारे व्युत्पन्न केलेले मुख्य मुद्दे, न्यूजरूमद्वारे सत्यापित

आयएनडी वि पाक एशिया कप 2025: भारताने आशिया चषक स्पर्धा  (Asia Cup 2025) जिंकली, मात्र पाकिस्तानचे मंत्री आणि आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी (Mohsin Naqvi) विजेतेपदाची ट्रॉफी देण्यासाठी उभे असल्याने भारताने ट्रॉफी (Asia Cup Trophy Controversy) स्वीकारली नाही. याच मुद्द्यावर स्पर्धा संपल्यानंतर पत्रकार परिषदेत पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आगा (Salman Ali Agha) याने एक खळबळजनक दावा केला.

सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) सुरुवातीला दोन वेळा माझ्याशी हस्तांदोलन केले होते. कर्णधारांच्या पत्रकार परिषदेत आणि रेफरींशी मिटिंग झाली तेव्हा त्याने मला हात मिळवला होता. मला खात्री आहे की, सूर्यकुमारच्या मनात हस्तांदोलन करण्याचा विचार होता, पण त्याला वेगळे आदेश देण्यात आले होते, त्यामुळे त्याचाही नाईलाज झाला. माझा त्याच्यावर राग नाही. पण त्यांनी जे केले ते खेळाच्या मैदानात साजेसे नव्हते, असं पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार सलमान अली आगा म्हणाला.

नेमकं काय घडलं? (Ind vs Pak Final What happened?)

भारतीय संघाचे कुलदीप यादव, अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा या भारतीय खेळाडूंनी आपली वैयक्तिक पारितोषिकं अन्य मान्यवरांच्या हस्ते स्वीकारली. पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंनी तिन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणं कटाक्षानं टाळलेलं. तसंच फायनलच्या नाणेफेकीआधी फोटो शूटला जाणंही टाळलेलं. आशिया चषक आणि वैयक्तिक पदकं स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळं आशिया चषकाचा पारितोषिक वितरण सोहळा तासभरापेक्षा उशिरानं सुरु झाला. तेवढा वेळ मोहसीन नक्वी हे एकटेच व्यासपीठावर उपस्थित होते.

ट्रॉफीबाबत आयसीसीचे नियम काय?(ट्रॉफी संबंधित आयसीसी नियम?)

ट्रॉफी स्वीकारण्यास कर्णधाराने नकार देणे आयसीसीच्या आचारसंहितेअंतर्गत येऊ शकते, परंतु त्याबाबत कोणताही विशिष्ट नियम नाही. हे क्रिकेटच्या भावनेविरुद्ध असेल. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला ट्रॉफी का स्वीकारली नाही याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल आणि त्यानंतर स्पर्धा संस्था (ACC) किंवा ICC याबाबत निर्णय घेईल. सदर घटनेप्रकरणी कोणत्याही नियमाचे उल्लंघन झाले आहेत का आणि जर तसे असेल तर उल्लंघनांसाठी कोण जबाबदार होते आणि कोणते दंड आकारले जाऊ शकतात, याबाबत आयसीसीकडून तपास केला जाऊ शकतो.

सूर्यकुमार यादव काय म्हणाला? (What Suryakumar Yadav Say?)

मी क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यापासून, क्रिकेट फॉलो करायला सुरुवात केल्यापासून असा प्रसंग मी कधीच पाहिलेला नाही की विजेत्या संघाने ट्रॉफी नाकारली आहे. तेही अशी ट्रॉफी जी जिंकण्यासाठी आम्ही प्रचंड मेहनत केली आणि सहजासहजी मिळालेली नाही. ही स्पर्धा जिंकणं आमच्यासाठी खूप कठीण होतं. आम्ही 4 तारखेपासून इथे होतो, सलग दोन उत्कृष्ट सामने खेळलो. मला वाटतं आम्ही यासाठी पात्र होतो. यापेक्षा जास्त काही मी सांगू शकत नाही, कारण मी सगळं एका वाक्यात सांगून टाकलंय. माझ्यासाठी खरी ट्रॉफी म्हणजे आमच्या ड्रेसिंग रूममध्ये बसलेले सर्व खेळाडू आणि संपूर्ण सपोर्ट स्टाफ आहेत. हाच तो खरा खजिना आहे, आणि हीच खरी ट्रॉफी आहे, ज्या गोड आठवणींसारख्या माझ्यासोबत कायम राहतील, असं सूर्यकुमार यादवने सांगितले.

संबंधित बातमी:

Ind vs Pak Asia Cup 2025 Final Trophy: फायनल संपल्यानंतर 1 तास राडा; मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन पळाला, भारतानेही दाखवून दिले, नेमकं काय काय घडलं?

Shoaib Akhter Ind vs Pak Asia Cup Final 2025: भारताने पुन्हा लोळवलं, ट्रॉफीवरुन राडा; शोएब अख्तरने पाकिस्तानला धू धू धुतलं, म्हणाला, आता थोडं…

आणखी वाचा

Comments are closed.