सोनेचांदीच्या दरवाढीचा ट्रेंड सुरुच; ऐन दसऱ्याच्या तोंडावर सोन्याच्या दरात 1500 रुपयांची वाढ


सोन्याचे चांदीचे दर अद्यतन जळगाव : देशातील सर्राफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड सुरुच असल्याचे चित्र आहे. सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला आहे. सणांचा कालावधी सुरु होत असताना सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. परिणामी आता सोने खरेदी जणू सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याचे चित्र आहे. अशातच आता सोन्याचे दरात पुन्हा 1500 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचे दर 1,16, 500 वर तर जीएसटीसह (GST) हेच दर 1,20, 000 हजार वर जाऊन पोहोचल्याची माहिती आहे. परिणामी, सोन्याच्या दराने आता नवा उच्चांक गाठला असल्याचं पाहायला मिळत आहे. एन दसऱ्याच्या तोंडावर ही वाढ झाल्याने ग्राहकांसाठी मात्र हि बाब काहीशी अडचणीची आणि अधिक खर्चिक झाली आहे.

ऐन दसऱ्याच्या तोंडावर सोन्याच्या दरात 1500 रुपयांची वाढ (Gold Silver Rate Today)

कधी रशिया युक्रेन युद्ध, तर कधी डोनाल्ड ट्रम्प यांचं टेरीफ धोरण, तर कधी अमेरिकन फेडरल बँकांनी घडविलेले व्याज दर या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून गेल्या काही महिन्यापासून सोन्याच्या दरात दिवसागणिक मोठी वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, कायदा दसरा सणाच्या मुहूर्ताच्या तोंडावर आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात 1500 रुपयांची मोठी वाढ होऊन सोन्याचे दर 1, 16, 500 तर जीएसटीसह हेच दर 1,20,000 च्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचले असल्याने दसऱ्याच्या मुहूर्तावर अपेक्षेप्रमाणे ग्राहक सोने खरेदी करू शकणार का? असा प्रश्न सुवर्ण व्यासायिकांना पडला आहे.

जागतिक बाजारात देखील सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. स्पॉट गोल्डच्या दरात 2 टक्क्यांची वाढ झाली असून ते 3824.61 डॉलर प्रति औंसवर पोहोचलं आहे. चांदीचे दर देखील 2 टक्क्यांनी वाढून 47.18 डॉलर प्रति औंसवर पोहोचलं आहे. विश्लेषकांच्या मते जागतिक मजबूत मागणी आणि डॉलर कमजोर झाल्यानं गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोने आणि चांदीतील गुंतवणुकीला प्राधान्य दिलं जातंय.

जागतिक मागणी वाढल्याने चांदी महागली (आज चांदीचा दर)

चांदीची किंमत 7000 रुपयांनी वाढून प्रति किलो दीड लाख रुपये या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. चांदीच्या दरवाढीमागे जागतिक पातळीवर वाढलेली औद्योगिक मागणी हे प्रमुख कारण मानले जात आहे. परिणामी, त्याचा थेट परिणाम दरांवर झाला असून चांदीने विक्रमी पातळी गाठली आहे. सुवर्ण व्यापारातील जाणकारांच्या मते, येत्या काही आठवड्यांत सोन्याच्या व चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारपेठेत सुरु असलेली आर्थिक अनिश्चितता, डॉलरचा दर, क्रूड ऑइलचे भाव आणि व्याजदरांमध्ये होणारे बदल याचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या किंमतींवर होत असतो. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आणि खरेदीदारांनी या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

आणखी वाचा

Comments are closed.