‘छावा’ नंतर अक्षय खन्नाचा ‘महाकाली’ मधील लूक होतोय व्हायरल

बॉलिवूडनंतर अक्षय खन्ना आता दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. तो प्रशांत वर्माच्या महिला सुपरहिरो चित्रपट ‘महाकाली’ मध्ये एक विशेष भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही, परंतु पडद्यामागे अक्षयच्या या नवीन लूकबद्दल मात्र अनेक गप्पांना उधाण येत आहे. अक्षयचा हा लूक नुकताच जाहीर करण्यात आला असून, यामध्ये अक्षय शुक्राचार्च ऋषींच्या भूमिकेत दिसणार आहे.

Chhaava- ‘छावा’तील औरंगजेबाची स्वारी निघाली दक्षिणेकडे!

दाक्षिणात्य कोणत्याही चित्रपटावर ही संशोधनाची मेहनत ही फार मोठ्या प्रमाणात केली जाते. केवळ कास्टिंगवर उत्तम संशोधन होत नाही. तर चित्रपटातील सर्व बाजूंचे उत्तम संशोधन करुनच दाक्षिणात्य सिनेमा हा तयार केला जातो. त्यामुळेच अक्षय खन्नाच्या पात्राविषयी फार कुठलीही माहिती उघड करण्यात आलेली नव्हती.

हनुमान चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत वर्मा पुन्हा एकदा त्यांच्या नवीन चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर लोकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत. प्रशांत वर्मा यांनी त्यांच्या आगामी चित्रपट ‘महाकाली’ची घोषणा केली आहे. यासोबतच प्रशांत वर्मा यांनी ‘महाकाली’मधील अक्षय खन्नाचा पहिला लूक प्रेक्षकांसमोर आणला आहे.

अक्षय खन्नाचा ‘महाकाली’मधील असुरगुरु शुक्राचार्य म्हणून पहिला लूक प्रदर्शित झाला असून, या लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
या चित्रपटात अक्षय खन्नाने गुरु शुक्राचार्यची भूमिका साकारली आहे. शुक्राचार्य यांच्या भूमिकेत अक्षय खन्नाला ओळखणे कठीण आहे. पांढरे कपडे घातलेले, लांब पांढरे केस आणि कपाळावर टिळक घातलेले अक्षय खन्नाचा हा लूक खरोखरच अप्रतिम आहे.

प्रशांत वर्मा यांनी त्यांच्या आगामी ‘महाकाली’ चित्रपटातील अक्षय खन्नाचा असुरगुरु शुक्राचार्य म्हणून पहिला लूक रिलीज केला आहे. चित्रपटाच्या इतर कलाकारांबद्दल किंवा प्रदर्शन कधी होणार याबद्दल मात्र त्यांनी कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.

Comments are closed.