लग्नाच्या दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं;युझेवेंद्रबाबत धनश्रीचं खळबळजनक विधान, नेमकं काय घडलं


युझवेंद्र चहलवरील धनाश्री वर्मा: भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांचा मार्च 2025 रोजी घटस्फोट झाला. दरम्यान, सध्या ‘राईज अँड फॉल’ या रिअॅलिटी शोमध्ये (Rise And Fall Realty Show) धनश्री वर्मा सहभागी झाली आहे. या शोमध्ये धनश्री युझवेंद्रसोबतच्या घटस्फोटाबाबत अनेक खुलासे करत आहे. आता धनश्रीने नवीन खळबळजनक दावा केला आहे. लग्न झाल्यानंतर दुसऱ्याचं महिन्यात युझवेंद्र चहलला रंगेहाथ पकडला होता, असं विधान धनश्री वर्माने केलं. धनश्री वर्माच्या या विधानाची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने मार्च 2025 मध्ये कायदेशीर घटस्फोट घेऊन आपलं नातं संपवलं. अशातच ज्यावेळी दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरलेला, त्यावेळी धनश्रीने युजवेंद्र चहलकडे 60 कोटी रुपयांची पोटगी मागितल्याच्या चर्चांना उधाण आलेलं. जे धनश्रीच्या कुटुंबानं अधिकृतपणे नाकारलं. पण नेमकं सत्य काय? याचा खुलासा आता स्वतः धनश्रीनं केला आहे. धनश्री सध्या ‘राईज अँड फॉल’ या रिअॅलिटी शोमध्ये दिसतेय. अलिकडच्याच एका भागात तिनं तिच्या घटस्फोटाबद्दल बोलताना म्हटलं की, 60 कोटी रुपयांची पोटगी मागितल्याच्या सर्व चर्चा निराधार असल्याचं म्हटलं आहे.

कोण आहे धनश्री वर्मा? (Who Is Dhanashree Verma)

धनश्री वर्मा एक यूट्यूबर आहे. ती डान्सर, कोरिओग्राफर  आणि एक सोशल मीडिया एन्फ्लूएंझरही आहे. यूट्यूबवर तिच्या डान्स व्हिडीओंनी लाखो व्ह्यूज मिळतात. तिचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. धनश्री अनेकदा लोकप्रिय बॉलिवूड गाण्यांचं नृत्यदिग्दर्शन करत व्हिडीओ पोस्ट करत असते.

धनश्री वर्माची एकूण संपत्ती का आहे? (धनाश्री व्र्मा संपत्ती).

धनश्री वर्माची एकूण संपत्ती 25 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. वेगवेगळ्या ब्रँड्सच्या जाहिराती करते. याच जाहिराती करण्याचे ती कोट्यवधी रुपये घेते. विशेष म्हणजे ती लवकरच एका दाक्षिणात्त्य चित्रपटात झळकणार आहे. दुसरीकडे युझवेंद्र चहलची संपत्ती 45 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. आयपीएल 2025 साठी युझवेंद्र चहलसाठी 18 कोटी रुपयांची बोली लागलेली आहे. त्याच्याकडे महागड्या गाड्या, आलिशान घर आहे. तोदेखील वेगवेगळ्या ब्रँड्सच्या जाहिराती करतो.

युझवेंद्र चहल अन् आरजे महावशच्या डेटिंगची चर्चा- (Yuzvendra Chahal And RJ Mahvash)

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेदरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि आरजे महावश (RJ Mahvash) दुबई क्रिकेट मैदानावर अंतिम सामना पाहण्यासाठी उपस्थित होते. युझवेंद्र चहल आणि आरजे महावशला एकत्र पाहिल्यानंतर दोघंही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली होती.

संबंधित बातमी:

Yuzvendra Chahal And Dhanashree Verma Divorce: युझवेंद्र चहल अन् धनश्री वर्माचा घटस्फोट मंजूर; वांद्रे कुटुंब न्यायालयाने दिला निर्णय

आणखी वाचा

Comments are closed.