दोन दिवसांनी टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध भिडणार; सामना कधी, कुठे अन् किती वाजता सुरु होणार?,


भारत विरुद्ध वेस्ट इंडीज चाचणी मालिका: आशिया चषकानंतर (Asia Cup 2025) आता टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध (India vs West Indies) पहिले कसोटी मालिका खेळेल. या घरच्या कसोटी मालिकेत फक्त दोन सामने असतील. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला कसोटी सामना 2 ऑक्टोबरपासून नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, आज सकाळी भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुबईहून थेट गुजरातला पोहोचला आहे. भारताचा उर्वरित संघही आज गुजरातमध्ये दाखल होईल.

टीम इंडियाचा धडाकेबाज संघ- (Team India Squad vs West Indies)

वेस्ट इंडिज विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात 7 फलंदाज, 4 अष्टपैलू खेळाडू आणि 4 गोलंदाजांचा समावेश केला आहे. फलंदाजांमध्ये शुभमन गिल (Shubhman Gill), यशस्वी जैस्वाल (Jaiswal), केएल राहुल (KL Rahul), साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, एन. जगदीसन यांचा समावेश आहे. तर अष्टपैलूध्ये रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, नितीशकुमार रेड्डी यांचा समावेश आहे. तसेच गोलंदाजीची जबाबदारी जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव यांच्यावर असणार आहे.

वेस्ट इंडिज विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ (Team India for series against West Indies):

शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीशकुमार रेड्डी, एन. जगदीसन (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव.

वेस्ट इंडिजचा कसोटी संघ- (West Indies Full Squad)

रोस्टन चेस (कर्णधार), जोमेल वारिकन, केव्हलॉन अँडरसन, एलिक एथानाझे, जॉन कॅम्पबेल, तेजनारायण चंद्रपॉल, जस्टीन ग्रिव्हस, शे होप, तेव्हिन इमलाच, जोहान लेने, ब्रेंडन किंग, अँडरसन फिलिप, खॅरी पिएर, जेडन सिल्स

भारत-वेस्ट इंडिज मालिकेचे वेळापत्रक- (Ind vs WI Schedule)

  1. पहिली कसोटी – 2-6 ऑक्टोबर (नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम, अहमदाबाद)
  2. दुसरी कसोटी – 10-14 ऑक्टोबर (अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली)

संबंधित बातमी:

Team India Squad vs West Indies : टीम इंडियाची घोषणा! रवींद्र जडेजा उपकर्णधार तर… BCCI ने वेस्ट इंडिजविरुद्ध ‘या’ 15 शिलेदारांना दिली संधी, पाहा संपूर्ण Squad

भारतीय संघाला आशिया कपची ट्रॉफी मिळणार की नाही?; आयसीसीचा नियम काय सांगतो?, A टू Z माहिती

आणखी वाचा

Comments are closed.