पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक गाडी चिपळूणातून धावली, अत्यावश्यक साहित्य घेऊन चिंदपूरला रवाना

महापूराने उध्वस्त झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील परांडा-चिंदपूर येथील पूरग्रस्तांना चिपळूण तालुक्याने मदत केली आहे.अत्यावश्यक साहित्य घेऊन एक गाडी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत चिंदपूरला रवाना झाले आहेत.

यावेळी चिपळूणचे प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, गटविकास अधिकारी श्रीमती उमा पाटील, नगरपरिषद मुख्याधिकारी विशाल भोसले आणि प्रशासनाने पुढाकार घेतला. यावेळी माजी सभापती पूजा निकम, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सचिन कदम, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Comments are closed.