ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे अर्थव्यवस्था अडचणीत; अमेरिकेत होणारी 70 टक्के निर्यात बंद

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर मोठा टॅरिफ लावला. या टॅरिफचा कोणताही परिणाम हा हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेवर होणार नसल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा थेट परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होताना स्पष्ट दिसत आहे. तसेच याबाबतच्या अहवालातूनही माहिती मिळत आहे. अमेरिकेने हिंदुस्थानवर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला. या टॅरिफचा परिणाम हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेवर दिसत आहे. हिंदुस्थानातून अमेरिकेत होणारी 70 टक्के निर्यात बंद झाली आहे.

हिंदुस्थानसाठी अनेक वर्षांपासून अमेरिका ही एक मोठी बाजारपेठ राहिली आहे. भारत-अमेरिकेचा व्यापार कोट्यवधींच्या घरात आहे. मात्र, आता अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर अमेरिके वस्तू पाठवणे अवघड झाले आहे. त्यामुळे आता व्यापाऱ्यांनी काही गोष्टींची निर्यात थांबव्याचा निर्णय घेतला. हिंदुस्थान रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने आपण त्यांच्यावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावत असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतरही भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली आहे.

अमेरिकेने लावलेल्या टॅरिफचा अत्यंत मोठा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झाल्याचे आता येणाऱ्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. देशाची आर्थिक वाढ मंदावेल अशी भीती व्यक्त होत आहे. आशियाई विकास बँकेने (ADB) म्हटले आहे की, 2026 च्या पहिल्या तिमाहीत 7.9 टक्के मजबूत वाढ झाली असली तरी, चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था सुमारे 6.5 टक्के दराने वाढेल. अमेरिकेने लावलेल्या 50 टक्के टॅरिफनंतर दुसऱ्या तिमाहीत तेजीत असलेली अर्थव्यवस्था मंदावू शकते. एडीबीने 2025 (आर्थिक वर्ष 2026) यासोबतच 2026 (आर्थिक वर्ष 2027) साठी भारताचा विकास दर 6.5 टक्के राहिल असा अंदाज आहे. त्यामुळे आता टॅरिफचे परिणाम दिसत आहे.

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 02 ऑक्टोबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

दैनिक-होरोस्कोप-ऑफ -02-ऑक्टोबर -2025-आणि-पंचांग-सॅमना-ऑनलाईन-न्यूज

>> योगेश जोशी, [email protected]

जाळी

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस कामाचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – कामामुळे प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – कार्यक्षेत्रात कामाचे कौतुक होणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबीयांसाठी वेळ काढावा लागणार आहे

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – प्रकृती सुधारणार आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेण्यासाठी चांगला दिवस आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीच्या कुरबुरी जाणवणार आहे
आरोग्य – मनाची अस्वस्थता वाढणार आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत
कौटुंबिक वातावरण – रागावर नियंत्रण ठेवा, दिवस समाधानात जाईल

कर्करोग

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – व्यवसाय वाढीसाठी चांगल्या संधी मिळतील
कौटुंबिक वातावरण – जोडीदाराचे चांगले सहकार्य मिळणार आहे

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजच्या दिवस संघर्षाचा ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – पथ्यपाणी सांभाळा
आर्थिक – कर्जासंबंधीची कामे मार्गी लावा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह तणाव जाणवणार आहे

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभ समाचार मिळण्याची शक्यता आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहण्याची शक्यता आहे
आर्थिक – मुलांसाठी खर्च होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मौजमजेत जाणार आहे

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू पंचम स्थानात, शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस घरातील कामांचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस प्रसन्नतेत जाणार आहे

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस धावपळीचा ठरणार आहे
आरोग्य – कामाचा ताण जाणवणार आहे
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे

धनु

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे.
आरोग्य – मनाची प्रसन्नता वाढणार आहे
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस प्रसन्नतेत जाणार आहे

मकर

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – मनावरील दडपण कमी होणार आहे
आर्थिक – आर्थिक आवक वाढणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटंबियांसोबत दिवस प्रसन्नतेत जाणार आहे

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे
आरोग्य – ताणतणाव वाढणार आहे
आर्थिक – आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कटुंबियांसोबत वादविवाद होण्याची शक्यता आहे

मीन

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस धनलाभाचा आहेत
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे

Comments are closed.