भारताकडून पराभवानंतर पाकिस्तानचा संताप, पीसीबीने खेळाडूंची NOC केली रद्द!
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) परदेशी टी20 लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंच्या सर्व अनापत्ती प्रमाणपत्रे (NOC) निलंबित केली आहेत. रिपोर्ट्सनुसार पीसीबीचे मुख्य परिचालन अधिकारी सुमैर अहमद सैयद यांनी 29 सप्टेंबर रोजी हा निर्णय जारी केला. याचा परिणाम बाबर आझम, शाहीन अफ्रीदी, मोहम्मद रिजवान आणि फहीम अशरफ यांसारख्या प्रमुख खेळाडूंवर होणार आहे, जे बिग बॅश लीग आणि ILT20 सारख्या मोठ्या लीगमध्ये खेळणार होते. हा निर्णय आशिया कप 2025 स्पर्धेच्या (Asia Cup 2025) अंतिम सामन्यात भारताकडून पाकिस्तानच्या झालेल्या पराभवानंतर घेण्यात आला आहे.
ईसपीएन क्रिकइन्फोने नोटीसमध्ये म्हटलं आहे, पीसीबी अध्यक्षांच्या मंजुरीने लीग आणि इतर परदेशी स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी दिलेली सर्व NOC पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात येत आहे.
रिपोर्ट्सनुसार, पीसीबी खेळाडूंच्या NOC ला परफॉर्मन्स-बेस्ड सिस्टीमशी जोडण्याचा विचार करत आहे. मात्र याचे निकष अद्याप जाहीर झालेले नाहीत. पाकिस्तानची प्रमुख घरेलू फर्स्ट क्लास स्पर्धा देखील ऑक्टोबरमध्ये सुरू होणार असून, ती आधी 22 सप्टेंबरला ठरली होती पण पुढे ढकलण्यात आली आहे.
ईसपीएन क्रिकइन्फोनुसार, NOC संबंधित संभाव्य सूट, कालावधी आणि निकष याबाबत स्पष्टता आलेली नाही. पीसीबीचे उद्दिष्ट खेळाडूंच्या राष्ट्रीय व घरेलू कामगिरीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे मूल्यमापन NOC शी जोडणे आहे. मात्र हे मूल्यमापन किती काळासाठी असेल आणि NOC निलंबन कधी हटवले जाईल, याबाबत अजून निश्चित माहिती समोर आलेली नाही.
Comments are closed.