पाकिस्तानात मोठा बॉम्बस्फोट, 10 जणांचा मृत्यू तर 32 जण जखमी

पाकिस्तानच्या बलुचिस्तानात प्रांतातील राजधानी क्वेटा येथे मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला असून 32 लोकं जखमी झाली आहेत. त्याने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जखमींचा आकडा पाहता आसपासच्या वैद्यकीय रुग्णालयांमध्ये आणीबाणीची घोषणा करण्यात आली.
या बॉम्बस्फोटाबाबत पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. यानुसार क्वेटा शहरातील पूर्व भागात फ्रंटियर कॉर्प्सचे मुख्यालय असून याच मुख्यालयाजवळ हा बॉम्बस्फोट झाला. हा बॉम्बस्फोट झाल्यानंतर या भागात मोठ्या प्रमाणात गोळीबारही झाला आहे. स्फोटानंतर परिसरात रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे.
पाकिस्तानच्या डॉन या वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, क्वेटामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. हा एक आत्मघाती हल्ला होता. या हल्ल्याचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे, ज्यामध्ये या स्फोटाची घटना दिसत आहे. या हल्ल्यात 32 लोकं गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांना क्वेटा येथील सिव्हिल रुग्णालय, बलूचिस्तान मेडीकल कॉलेजचे रुग्णालय आणि ट्रामा सेंटर येथे नेण्यात आले आहे.
Comments are closed.