आशिया कप ट्रॉफी सध्या कुणाकडे, भारतात कधी येणार? जाणून घ्या सविस्तर अपडेट
आशिया कप फायनलमध्ये भारताने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला (IND vs PAK Asia Cup Final). या विजयानंतर टीम इंडियाला ट्रॉफी दिली जाणार होती. पण हीच आशिया कप ट्रॉफी आता वादाचा विषय ठरत आहे.
भारतीय संघाने एशियन क्रिकेट कौन्सिलचे चेअरमन मोहसिन नकवी यांच्या हातून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर नकवी यांनी ट्रॉफी मैदानाबाहेर नेली. या घटनेला दोन दिवस उलटले तरी अजूनही प्रश्न तोच आहे की, आशिया कप ट्रॉफी कुठे आहे आणि ती भारतात कशी येणार?
रिपोर्टनुसार, मोहसिन नकवी अजूनही ट्रॉफी आणि मेडल्स स्वतःकडेच ठेवून आहेत. सध्याच्या रिपोर्टनुसार, नकवी भारतीय संघाला ट्रॉफी व मेडल द्यायला तयार आहेत, पण त्यांनी त्यासाठी एक अट ठेवली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, ट्रॉफी आणि मेडल ते देतील पण त्यासाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात यावा, ज्यामध्ये ते स्वतः टीम इंडियाला ट्रॉफी आणि मेडल्स देतील. ही अट मात्र भारतीय संघ मान्य करेल असं वाटत नाही, कारण फायनलनंतर त्यांनी नकवी यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिलाच होता.
एक पर्याय असा आहे की, मोहसिन नकवी यांनी हट्ट सोडून कोणत्याही अटीशिवाय भारतीय संघाला ट्रॉफी आणि मेडल परत द्यावेत. तर दुसरीकडे, BCCI अधिकृत प्रक्रियेने ACC किंवा गरज भासल्यास ICCकडे याबाबत तक्रार दाखल करेल.
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, BCCIचे सचिव देवजीत सैकिया (Devjit Sakiya) यांनी स्पष्ट केलं आहे की, मोहसिन नकवी यांना ट्रॉफी स्वतःकडे ठेवण्याचा काहीही अधिकार नाही. त्यांनी इशारा दिला आहे की, आधी ACC आणि गरज पडल्यास ICCमध्येही याबाबत औपचारिक तक्रार दाखल केली जाईल.
Comments are closed.