‘मी तिथे कार्टूनसारखा..’, बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्लांनी विचारलेल्या कठोर प्रश्नावर नक्वी नेमकं काय म्हणाले?
आज दुबईत आशियाई क्रिकेट काउंसिल (ACC) ची बैठक झाली. यावेळी भारताचे प्रतिनिधी म्हणजेच बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Bcci Vice president Rajiv Shukla) यांनी टीम इंडियाला ट्रॉफी का दिली गेली नाही यावर जोरदार प्रश्न उपस्थित केले. शुक्ला म्हणाले की आशिया कपची ट्रॉफी कुणाचीही वैयक्तिक मालकी नाही, विजेता टीमला ती औपचारिक पद्धतीने देणे आवश्यक होते.
राजीव शुक्ला यांनी ACC चेअरमन मोहसिन नक्वी यांना थेट विचारले, भारतीय टीमला ट्रॉफी का दिली गेली नाही? शुक्ला यांचे म्हणणे होते, ही ACC ची ट्रॉफी आहे, कुणाच्याही वैयक्तिक मालकीची नाही.
फायनलनंतर सव्वा तासापर्यंत पोस्ट-मॅच प्रेझेंटेशन सुरू होऊ शकले नाही. मोहसिन नक्वीसह इतर मान्यवर पोडियमवर उभे होते. मैदानात बसलेल्या टीम इंडियाचे फोटोही त्यावेळी समोर आले. नक्वी म्हणाले, मी तिथे कार्टूनसारखा उभा होतो, एसीसीला कुठेही हे लिहून सांगितले नव्हते की टीम इंडियाला मी ट्रॉफी देऊ नये.
भारतीय प्रतिनिधींनी अनेकदा प्रश्न विचारले, पण नक्वी म्हणाले की या मुद्द्यावर नंतर चर्चा केली जाईल, आत्ता नाही.
फायनलनंतर ACC चेअरमन ट्रॉफी घेऊन मैदान सोडल्याने टीम इंडियाला ट्रॉफी व मेडल न घेता परतावे लागले. भारतीय खेळाडू आजच भारतात परतले. सूर्यकुमार यादवचे (Suryakumar Yadav) मुंबईत तर गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांचे अहमदाबादमध्ये भव्य स्वागत झाले.
Comments are closed.