आशिया कप ट्रॉफी मिळवण्यासाठी अजून वाट पाहावी लागणार? अनेक देशांच्या क्रिकेट बोर्डांमध्ये चर्चा सुरू
भारत आशिया कप (Team india Won Asia Cup Final) जिंकून दोन दिवस झाले आहेत, पण ट्रॉफीवर वाद अजून सुरू आहे. रिपोर्ट्सनुसार हा ट्रॉफी वाद आणखी काही काळ चालणार आहे, त्यामुळे भारतीय टीमला ट्रॉफी आणि मेडल मिळायला आणखी उशीर होऊ शकतो. याशिवाय, भारत, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचे क्रिकेट बोर्ड हा वाद मिटवण्यासाठी बैठक घेऊ शकतात.
30 सप्टेंबरला दुबईत ACC सदस्यांची बैठक झाली, ज्यात निर्णय घेतला की, या 5 देशांच्या बोर्डांनी मिळून या प्रकरणावर निर्णय घ्यावा.
28 सप्टेंबर रोजी भारताने फायनलमध्ये पाकिस्तानला 5 विकेटने हरवले होते. टीम इंडिया आशियाई क्रिकेट काउंसिलचे अध्यक्ष आणि PCB चेअरमन मोहसिन नक्वी (Mohsin Naqvi) यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारायला तयार नव्हती. ACC चे अध्यक्ष असतानाही, नक्वी यांनी सर्व आशियाई बोर्डांबद्दल निष्पक्ष राहावे असे अपेक्षित होते, पण त्यांनी उलट केले. टीम इंडियाच्या (Team india) मागण्या नाकारून ते ट्रॉफी घेऊन हॉटेलला गेले.
भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेशचे क्रिकेट बोर्ड सदस्य या प्रकरणावर बैठक घेतील. BCCI ने आधीच स्पष्ट केले आहे की, ते ह्या बाबतीत मोहसिन नक्वीविरुद्ध ICC मध्ये तक्रार करू शकतात.
30 सप्टेंबरला झालेल्या आशियाई क्रिकेट काउंसिलच्या बैठकीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी होते. या बैठकीत BCCIचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajiv Shukla) भारताचे प्रतिनिधी होते. बैठकीत आणखी दोन मुद्द्यांवर चर्चा झाली ते म्हणजे ACC चे उपाध्यक्ष कोण असणार, पुढील ACC इव्हेंट्सचं वेळापत्रक कसं असेल?
Comments are closed.