Health Tips: मासिक पाळीच्या काळात जिमला जावे का? जाणून घ्या थेट तज्ञांचे मत
मासिक पाळीदरम्यान अनेकदा महिलांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जातो. मग अशा वेळी जिमला जाऊन वर्कआउट करावे का? हा प्रश्न पडतो. खरे तर, मासिक पाळी असताना व्यायाम करणे चांगले असते. यामुळे वेदनांपासून आराम मिळतो. पण जिममध्ये हेव्ही वर्कआउट करणे योग्य की अयोग्य हे जाणून घेऊया..( Is Workout During Periods In Gym Safe? )
तज्ञांच्या मते, मासिक पाळीच्या काळात विश्रांती घ्यावी, झोपून राहावे, जास्त धावपळ करू नये असा सल्ला दिला जातो. मात्र हे पूर्णपणे चुकीचे आहे. खरे तर, या काळात सौम्य व्यायाम करावा आणि योगा करावा. तसेच जर तुम्हाला जिममध्ये जायचे असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. म्हणजेच जिममध्ये तुम्ही सायकलिंग, कार्डिओ किंवा स्टिचिंग करू शकता. मात्र 10 आणि 20 किलो वजनाच्या खूप जड वस्तू उचलणे टाळावे. कारण यामुळे शरीरावर आणि गर्भाशयावर भार पडू शकतो आणि जास्त रक्तस्त्राव होतो.
दरम्यान, मासिक पाळीच्या चार दिवसात योगा करणे अत्यंत फायदेशीर ठरते. म्हणजेच सूर्यनमस्कार, अनुलोम विलोम या गोष्टी करणे चांगले असते. मात्र शीर्षासनसारखी उलट्या दिशेने उभे राहण्याची योगासने करू नयेत. यामुळे रक्ताचा प्रवाह उलट दिशेने वाहू लागतो. त्यामुळे या काळात सोपी योगासने करावीत.
मासिक पाळीच्या काळात तुम्ही जिममध्ये जाऊ शकता आणि योगाही करू शकता. मात्र केवळ जास्त जड वस्तू उचलू नका किंवा वाकवणारे योगासने टाळा. यामुळे गर्भाशयावर दबाव येणार नाही आणि जास्त रक्तस्त्राव होणार नाही.
Comments are closed.