ताडोबा सफारीला उत्साहात सुरुवात; पहिल्याच दिवशी पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पावसाळ्याच्या तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी सुरू झाला. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यात कोअर प्रकल्प बंद ठेवण्यात येतो. मोहर्लीच्या सरपंच सुनीता काटकर यांच्या हस्ते सफारीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी व्यवस्थापनातील अधिकारी, गाईड आणि पर्यटकांची उपस्थिती होती.
पहिल्याच दिवशी पर्यटकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. देशाच्या विविध भागातून पर्यटक दाखल झाले. त्या सर्वांचे पुष्पगुच्छ देत स्वागत करण्यात आले. अतिशय उत्साहात ताडोबा सफारीला प्रारंभ झाला. पहाटेपासूनच पर्यटकांनी द्वारावर गर्दी केलेली बघायला मिळाली. याशिवाय हॉटेल व्यावसायिक, गाईड आणि पर्यटनावर अवलंबून असणारे इतर घटकही यामुळे सुखावले आहे. पर्यटकांमध्ये तर उत्साह ओसंडून वाहत होता. हास्यजत्रा फेम प्रसिद्ध विनोदी कलावंत प्रसाद खांडेकर हेही आपल्या कुटुंबासह ताडोबात दाखल झाले. यावेळी पर्यटकांना पाण्याच्या दोन बॉटल्स विनामूल्य देण्यात आल्या.
Comments are closed.