विजय मल्होत्रा ​​यांचे निधन झाले

दिल्लीतील ज्येष्ठ भाजप नेते : पंतप्रधान मोदींसह मान्यवरांची श्रद्धांजली

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ज्येष्ठ भाजप नेते प्राध्यापक विजय कुमार मल्होत्रा यांनी मंगळवारी सकाळी 6 वाजता वयाच्या 94 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ते बऱ्याच काळापासून आजारी होते. त्यांच्या निधनामुळे भाजपमध्ये शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: त्यांच्या निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली वाहिली. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह अन्य भाजप नेतेही 21 गुरुद्वारा रकाबगंज रोड येथील त्यांच्या अधिकृत निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी पोहोचले होते. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनीही विजय कुमार मल्होत्रा यांना श्रद्धांजली वाहिली.

विजय कुमार मल्होत्रा यांचे दिल्लीच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान होते. त्यांनी दिल्लीच्या सर्वांगीण विकासाचा पाया रचला होता. ते 1967 ते 1971 पर्यंत दिल्लीचे मुख्य कार्यकारी नगरसेवक असताना पटेल नगर ते मोती नगर यांना जोडणारा दिल्लीचा पहिला उ•ाणपूल बांधण्यात आला होता. दिल्लीत 16 महाविद्यालये स्थापन करण्याचे श्रेयही मल्होत्रा यांना जाते.

अनेक महत्त्वाची पदे भूषवली

प्राध्यापक विजय कुमार मल्होत्रा हे संसदेत भाजप संसदीय पक्षाचे उपनेते, लोकलेखा समितीचे अध्यक्ष आणि दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. त्यांच्या कार्यकाळात भाजपच्या कोणत्याही निषेधाचा इतका व्यापक परिणाम होत असे की पोलिसांना पाण्याच्या तोफांचा आणि अश्रुधुराचा वापर करावा लागत असे. आज दिल्लीत दिसणारा विकास विजय कुमार मल्होत्रा यांनी सुरू केला होता. ते दिल्लीचे सर्वात तरुण मुख्य कार्यकारी नगरसेवक होते. दिल्ली आणि भाजपच्या विकासात त्यांचे योगदान अभूतपूर्व होते. दिल्लीत भाजपची स्थिती भक्कम करण्यातही त्यांचे बहुमूल्य योगदान राहिले आहे

Comments are closed.