मानखुर्दमध्ये तरुणाची हत्या; नऊ जणांना अटक

क्षुल्लक कारणावरून मानखुर्दमध्ये एका 32 वर्षीय तरुणाची हत्या झाल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी  मानखुर्द पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेतले असून त्यात दोघा महिलांचा समावेश आहे. मानखुर्द परिसरात मृत आणि आरोपी एकाच ठिकाणी राहतात.  मृत तरुण वरच्या घरात तर आरोपी महिला खालच्या घरात राहण्यास आहे. विजेवरून दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी खालच्या खोलीत राहणाऱ्या महिलेने त्या तरुणाला शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. त्यावेळी त्या महिलेच्या मुलाने त्या तरुणावर चाकूने वार केले. या हल्ल्यात त्या तरुणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला.  हा प्रकार कळताच मानखुर्द पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून नऊ जणांना ताब्यात घेतले. त्यात दोन महिलांचा समावेश आहे.

Comments are closed.