Kantara Chapter 1 – ऋषभ शेट्टीला मोठा धक्का, रिलीजपूर्वी प्रीमियर शो का केला रद्द?

कांतारा चॅप्टर वन च्या माध्यमातून ऋषभ शेट्टी पुन्हा परत येत आहे. २ ऑक्टोबरला प्रदर्शित होणारा हा चित्रपट, वरुण धवनच्या “सनी संस्कार की तुलसी कुमारी” सोबत टक्कर देणार आहे. परंतु अॅडव्हान्स बुकिंगमध्ये, ऋषभ शेट्टी आणि वरुण या दोघांनाही पसंती आहे. परंतु यामध्ये सर्वात जास्त बाजी ही ऋषभ शेट्टी याने मारली आहे. परंतु चित्रपट रिलीज होण्याआधीच त्याला मोठा धक्का बसला आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. चित्रपटाची आगाऊ बुकिंग नुकतीच सुरू झाली. आता एका न्यूज वेबसाइटवर एक वृत्त आले आहे. याअंतर्गत निर्मात्यांनी १ ऑक्टोबरच्या रात्री “कांतारा चॅप्टर १” चे प्रीमियर शो प्रसारित करण्याची योजना आखली होती. पण आता मात्र शेवटच्या क्षणी प्रीमियरचा शो रद्द करण्यात आलेला आहे. प्रीमियर शोची योजना आखली होती, परंतु काही महत्त्वाच्या कारणास्तव हा शो रद्द करण्यात आला आहे. त्यामुळेच आता वितरकांनी २ ऑक्टोबरच्या सकाळपासून चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. TV9 दिलेल्या वृत्तानुसार आता या चित्रपटाचा प्रीमियर शो रद्द करण्याचा घाट निर्मात्यांनी घातला आहे. पण यामागचे कारण अजूनही अस्पष्ट आहे.

चित्रपटाचा पहिला भाग बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट ठरला आणि कोटींची कमाई केली. त्यामुळेच ऋषभ शेट्टीच्या बजेटमध्येही वाढ करण्यात आली होती. या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये आधीच १८.१ दशलक्ष (अंदाजे $१.८ दशलक्ष) पेक्षा जास्त कमाई केली आहे.

Comments are closed.