साताऱ्यातील 13 महसूल मंडलांत अतिवृष्टी, एक हजार हेक्टर शेतीचे नुकसान

पावसाची चूक

सातारा जिह्यातील 13 महसूल मंडलांमध्ये अतिकृष्टी झाली आहे. पाकसामुळे सुमारे 1 हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. याकेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, निकडणूक उपजिल्हाधिकारी भगकान कांबळे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, जिह्यात 27 रोजी 13 महसूल मंडलांमध्ये अतिकृष्टी झाली. म्हसकड शहरातील 22-23 दुकानांमध्ये पाणी शिरले. बंद झालेले रस्ते आता खुले झाले आहेत. दि. 28 रोजी महाबळेश्वरमधील 3 महसूल मंडलांमध्ये अतिकृष्टी झाली. पंचनाम्याचे काम सुरू आहे. सुमारे 1 हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. कृषी सहायक, तलाठी आणि ग्रामसेकक यांची टीम नुकसान पाहणीसाठी पाठकली जाते. नुकसान 33 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर त्याप्रमाणे नुकसानभरपाई देण्याचे निर्देश आहेत.

जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, पीककापणी प्रयोगानंतर उत्पन्नात घट आली, तर पीककिमा लागू होतो. जिह्यातील प्रत्येक तालुक्याचे प्रमाणभूत पीक उत्पन्न निश्चित केलेले असते. जास्त घट असेल आणि 50 पेक्षा कमी पैसेकारी असेल तर त्याठिकाणी निकष लागू होतात. याकर्षी पीककिमा काढलेल्या शेतकऱयांची संख्या कमी आहे. साताऱयासह राज्यातील दुष्काळी जिह्यातही अतिकृष्टी झाली आहे. जिह्यात मे महिन्यापासून सप्टेंबरपर्यंत पाऊस पडत आहे. प्रत्येक महिन्यात थोडीफार अतिकृष्टी झाली असल्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले.

Comments are closed.