आरसीबी विक्रीच्या उंबरठ्यावर, ललित मोदींचा सनसनाटी दावा
इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात ग्लॅमरस संघ म्हणून ओळखली जाणारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी कारण ठरले आहे आयपीएलचे संस्थापक ललित मोदी यांचा मोठा दावा. मोदी यांच्या दाव्यानुसार ब्रिटिश स्पिरिट्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी डियाजिओ पीएलसीने घ्झ्थ् 2026 आधीच Rण्ँ विक्रीचा निर्णय घेतला आहे.
विराटमुळे उंचावली आरसीबी ची ब्रॅण्ड व्हॅल्यू
विराट कोहलीच्या उपस्थितीमुळे आणि आयपीएलमधील पहिल्या विजेतेपदामुळे आरसीबीची ब्रॅण्ड व्हॅल्यू सध्या शिखरावर पोहोचली आहे. अहवालांनुसार, संघाची किंमत जवळपास 269 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 2,386 कोटी रुपये) इतकी आहे. या झपाटय़ाने वाढलेल्या मूल्यमापनामुळे आरसीबीने पाच-पाच वेळा विजेते ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांनाही मागे टाकले आहे.
विजय जल्लोषातील आरोपी बदलली परिस्थिती
जून 2025 मध्ये आरसीबीने पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकताच बंगळुरूमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले, मात्र विजय परेडदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 11 चाहत्यांचा मृत्यू झाला आणि 50 हून अधिक जखमी झाले. या दुर्दैवी घटनेनंतर डियाजिओ कंपनीने संघ विकण्याचा विचार सुरू केल्याच्या अफवा पसरल्या. त्यावेळी कंपनीने त्या बातम्या फेटाळल्या होत्या.
मोदींचा रोखठोक उद्भासन
आता ललित मोदींनी सोशल मीडियाच्या ‘एक्स’ वर सनसनाटी दावा केला आहे. त्यांनी लिहिले, ‘पूर्वी नाकारण्यात आले होते, पण आता मालकांनी आरसीबी विकण्याचा निर्णय घेतलाच आहे. मला खात्री आहे की, एखादा मोठा ग्लोबल फंड किंवा सार्वभौम फंड ही टीम खरेदी करेल. हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा सौदा ठरेल.’
मोदींच्या मते, या विक्रीतून आयपीएल फ्रेंचायझींच्या किमान मूल्यमापनाची नवी पातळी ठरेल आणि लीगची जागतिक प्रतिमा आणखी उंचावेल.
नवा मालक कोण?
क्रिकेटविश्वात आता चर्चा रंगली आहे की, आरसीबीचा नवा मालक कोण ठरणार? मोदींच्या इशाऱयांनुसार आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार किंवा कोणती मोठी ग्लोबल कंपनी या खरेदीत रस दाखवू शकते. जर असे झाले तर हिंदुस्थानच्या क्रीडा इतिहासातील हे सर्वात मोठा आर्थिक सौदा ठरेल.
आयपीएलसाठी नवा बेंचमार्क
ललित मोदी म्हणाले की, ‘आरसीबीच्या विक्रीमुळे इतर सर्व आयपीएल संघांच्या मूल्यातही वाढ होईल. हा करार लीगसाठी नवा बेंचमार्क ठरेल आणि आयपीएलची जागतिक क्रीडा बाजारपेठेतली ताकद आणखी मजबूत करेल.’
Comments are closed.