क्रीडा प्रशासक विजयकुमार मल्होत्रा यांचे निधन, हिंदुस्थानात तिरंदाजीला बळकटी देणारा दूरदर्शी नेता हरपला

राजकीय नेते आणि अनुभवी क्रीडा प्रशासक विजयकुमार मल्होत्रा यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने 93 व्या वर्षी निधन झाले. तिरंदाजीला हिंदुस्थानातील अग्रगण्य खेळांमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील.

कठीण काळात आयओएचे नेतृत्व

2010 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भ्रष्टाचार प्रकरणानंतर सुरेश कलमाडी यांना अटक झाल्यावर मल्होत्रा यांची 26 एप्रिल 2011 ते 5 डिसेंबर 2012 या कालावधीत हिंदुस्थानी ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) कार्यवाहक अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली.

स्वच्छ प्रतिमा आणि मितभाषी शैलीसाठी ओळखले जाणारे मल्होत्रा यांनी त्या कठीण काळात आयओएला योग्य दिशा दिली होती. त्यांच्या कार्यकाळात संघटनेत काही प्रमाणात पारदर्शकता आणण्यात यश आले. गटबाजीने ग्रासलेल्या संस्थेच्या राजकारणापासून ते दूर राहिले. त्यांच्या अंतरिम अध्यक्षपदानंतर झालेल्या निवडणुकांनंतर 4 डिसेंबर 2012 रोजी ‘आयओए’वर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने बंदी घातली, जी 11 फेब्रुवारी 2014 ला हटविण्यात आली.

Comments are closed.