टीम इंडियाने फायनलमध्ये ‘ती’ मोठी चूक केली होती, पण पाकिस्तानने… माजी खेळाडूला अश्रू अनावर
आयएनडी वि पाक एशिया कप फायनल: आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताकडून लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर (Mohmham mair) खूपच निराश झाला आहे. मॅच संपल्यानंतर त्याने सोशल मीडियावर इमोशनल व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडीओत मोहम्मद आमीर याने पाकिस्तानी संघाच्या (Pakistan) खराब कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. पाकिस्तानने या सामन्यात विजयाचे आयते ताट भारतीय संघाला (Team India) वाढून दिले. पाकिस्तानसाठी खूप मोठी संधी होती. पण ही संधी पाकिस्तानने गमावली, असे मोहम्मद आमीर याने म्हटले. या व्हिडीओत मोहम्मद आमीर याला अश्रू अनावर झाले होते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Ind Pakistan Final Match)
अजूनपर्यंत काय झालं, हेच समजत नाही. पाकिस्तानने विजयाचा घासा आयता भारतीय संघाला दिला. पाकिस्तानी संघासाठी ही खूप मोठी संधी होती. पण त्यांनी ती वाया घालवली. आम्ही हा सामना जिंकू शकत होतो. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पाकिस्तानला फलंदाजी दिली होती. इथेच पाकिस्तानला मोठा फायदा झाला होता. अंतिम सामन्यात नेहमी फलंदाजी आधी करावी, हे माझे मत आहे. जेणेकरुन चांगल्या धावा करुन समोरच्या संघावर दबाव आणता येतो. अंतिम सामन्यात पाकिस्तानी संघाची सुरुवातही चांगली झाली होती. फायनलमध्ये तुम्ही यापेक्षा आणखी काय अपेक्षा करता? 11 षटकांत पाकिस्तानच्या 103 धावा झाल्या होत्या, फक्त एक विकेट पडला होता. फरहान आणि फकर यांनी संघाला खरोखरच खूप चांगली सुरुवात करुन दिली होती. मात्र, त्यानंतर पाकिस्तानी संघाचा डाव ढेपाळला, असे मोहम्मद आमीर याने म्हटले.
टी-20 क्रिकेटमध्ये 147 ही धावसंख्या डिफेंड करता येत नाही. त्यामुळे पाकिस्तानी गोलंदाजांनी दोष देता येणार नाही. 147 ही धावसंख्या पार करण्यासाठी फक्त एका चांगल्या भागीदारीची गरज असते. ट्वेन्टी-20 क्रिकटमध्ये 145 ते 150 धावा करुन जिंकण्याचा काळ गेला, हे मी गेली अनेक वर्षे सांगत आहे. प्रत्येक षटकात दहाच्या आसपास धावा करत राहून एक मोठी भागीदारी केली की ही धावसंख्या पार करणे सहज शक्य आहे. त्यामुळे पाकिस्तानी गोलंदाजांना कोणताही दोष देता येणार नाही. पाकिस्तानने चांगली सुरुवाती होऊनही विजयाचा घास आयता भारतीय संघाला दिला, असे मोहम्मद आमीर याने म्हटले.
https://www.youtube.com/watch?v=2bqz9admgn8
आणखी वाचा
ट्रॉफी घेऊन पळाला, शाहीद अफ्रिदीने मोहसीन नक्वीला दोन पर्याय दिले; पाकिस्तानमध्ये खळबळ, काय म्हणाला?
आणखी वाचा
Comments are closed.