IND vs WI: जसप्रीत बुमराहच्या फिटनेसबाबत शुबमन गिलचा मोठा खुलासा, प्लेइंग इलेव्हन बाबततही दिली प्रतिक्रिया!
आशिया कप 2025 (Asia Cup 2025) जिंकल्यानंतर टीम इंडिया आता वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेत मैदानात उतरताना दिसणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे (IND vs WI). यातील पहिला सामना 2 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हन आणि जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) फिटनेसबाबत चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, ज्यावर आता कर्णधार शुबमन गिलने (Shubman gill) प्रेस कॉन्फरन्समध्ये उत्तर दिले आहे.
अतिरिक्त वेगवान गोलंदाजासह टीम इंडिया मैदानात उतरू शकते. वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या कसोटी सामन्याआधी टीम इंडियाचा शुबमन गिलने प्रेस कॉन्फरन्स घेतली. यावेळी गिलने सांगितले, प्लेइंग इलेव्हनबाबत उद्या निर्णय कळेल. हवामान आणि खेळपट्टीची परिस्थिती पाहून एका अतिरिक्त वेगवान गोलंदाजाला संधी मिळू शकते. खेळपट्टीवरील ओलसरता पाहून शेवटचा निर्णय घेण्यात येईल.
या कसोटी मालिकेसाठी यशस्वी जयस्वाल, केएल राहुल ते मोहम्मद सिराजपर्यंत अनेक खेळाडू संघात परतले आहेत. आशिया कप 2025 मध्ये या खेळाडूंना संधी मिळालेली नव्हती. आता पुन्हा केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल (KL Rahul & Yashsvi jaiswal) टीम इंडियासाठी सलामीला उतरतील. रिषभ पंत (Rishbh Pant) जखमी असल्यामुळे मालिकेत नाही, त्याची जागा ध्रुव जुरेल (Dhruv jurel) घेईल.
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वाशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
Comments are closed.