IND vs WI: टीम इंडियाच्या सामन्यांच्या वेळेत बदल! भारत-वेस्टइंडीज पहिला कसोटी आता या वेळी सुरू होणार!
आशिया कपच्या (Asia Cup 2025) थरारानंतर आता टीम इंडिया क्रिकेटच्या सर्वात लांब फॉरमॅटमध्ये पुन्हा मैदानावर येणार आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात (Shubman gill Captaincy) भारतीय संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजशी भिडेल (Test series between IND vs WI). मालिकेचा पहिला सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. आशिया कपमध्ये तुम्ही टीम इंडियाचे सर्व सामने संध्याकाळी बघत आनंद घेतला होता, पण आता आपल्या आवडत्या खेळाडूंना सकाळी खेळताना पहावे लागणार आहे.
भारत आणि वेस्ट इंडिजमधील पहिल्या कसोटी सामन्यात पहिला चेंडू सकाळी 9:30 वाजता फेकला जाईल. तर, टॉस यापूर्वी अर्धा तास म्हणजे 9 वाजता होईल. पहिल सत्र 9:30 पासून 11: 30 पर्यंत चालेल. त्यानंतर लंच ब्रेक असेल. दुसर सत्र 12:10 पासून 2:10 पर्यंत होईल.
यानंतर टी-ब्रेक घेतला जाईल. तिसरा आणि शेवटच सत्र 2:30 पासून सुरु होईल आणि 4:30 वाजता पहिल्या दिवसाचा खेळ संपेल. पाच दिवसही सामना सुरू होण्याची वेळ हाच राहील.
Comments are closed.