संगमनेरमध्ये नदीपात्रात वाहून गेलेल्या संदीप केरेचा 58 तासानंतर मृतदेह सापडला

घरी परतत असताना दुचाकीसह वाहून गेलेल्या संदीप केरेचा मृतदेह तब्बल 58 तासांनी नदीपात्रात आढळून आला. चिखली गावातील काही तरुण नदीवर अंघोळीसाठी गेले असता त्यांना नदीकिनारी संदीपचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे चिखली परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच चिखली, केरेवाडी परिसरातील ग्रामस्थ आणि केरे यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. संदीपचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घुलेवाडी येथे पाठवण्यात आला. त्यानंतर केरेवाडीत त्याच्यावर अंतिम संस्कार केले जातील.
संदीप केरे हा रविवारी रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान केस कापून आपल्या घरी परतत असताना दुचाकीसह नदीपात्रात वाहून गेलेा होता. सलग दोन दिवस नातेवाईक, ग्रामस्थ आणि महसूल विभागाचे कर्मचारी संदीपचा शोध घेत होते. काल रात्री नऊ वाजेपर्यंत शोध घेऊनही ते कुठेही आढळून आले नाही. शोध लागत नसल्याने आणि रात्र झाल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली होती. यानंतर बुधवारी नदीच्या कडेला संदीपचा मृतदेह आढळून आला. संदीपच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
Comments are closed.